राज्यनाट्य स्पर्धा उद्धघाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यनाट्य स्पर्धा उद्धघाटन
राज्यनाट्य स्पर्धा उद्धघाटन

राज्यनाट्य स्पर्धा उद्धघाटन

sakal_logo
By

२००८२


चित्रनगरीसाठी लागेल तेवढा निधी
सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख; राज्यनाट्य स्पर्धा अंतिम फेरीचे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः ‘‘मुंबई चित्रनगरीच्या धर्तीवर कोल्हापूरची चित्रीनगरीही विकसीत व्हावी, २४ तास चित्रीकरण सुविधा सुरू व्हावी जेणेकरून मराठी हिंदीच नव्हेतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण होऊ शकेल अशा सुविधा देण्यासाठी मंजुरी देत आहोत. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही.’’ अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे दिली. सांस्कृतिक कार्य संचनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या हिरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी केशवराव भोसले नाट्यगृहात आजपासून सुरू झाली. श्री. देशमुख यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले.
श्री. देशमुख म्हणाले, ‘‘राज्य नाट्य स्पर्धांना ६० वर्षांची परंपरा आहे. स्पर्धेने अनेक कलावंत दिले. ही परंपरा सांस्कृतिक कार्य संचनालय जोपासत आहे. मराठी नाट्य क्षेत्राला नवे काय देता येईल याचा विचार करताना अंतिम फेरीत जे नाटक अव्वल ठरेल अशा नाटकाच्या प्रयोगाला राज्यात, देशात, आंतर राष्‍ट्रीयस्तरावर व्यासपीठ दिले जाईल. अभिनय, दिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा आदी कलात सरस ठरणाऱ्या कलावंताना मुंबईतील मनोरंजन क्षेत्रात संधी देण्यासाठी त्यांच्या ऑडिशनही घेतल्या जातील. या सोबत चित्रपट नाट्य व मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी धोरण ठरवण्यात येत आहे.’’
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘‘चित्रतपस्वी भालाजी पेंढारकर, व्ही. शांताराम अशा दिग्गज कलावंतांपासून कोल्हापूरची चित्रपट परंपरा सुरू आहे. नव्या काळात चित्रपटनिर्मिती भक्कम करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. चित्रनगरीत मराठी हिंदी चित्रपट मालिकांचे चित्रीकरण होत आहे तरीही गगनबावडा, विशाळगड, पारगड, पन्हाळा आदी भागात चित्रीकरण व्हावे अशी स्थळे विकसित करण्यात येत आहेत. येथे चित्रीकरण पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास रोजगारालाही बळ मिळेल.’’

विमान सेवा सुरळित व्हावी
कोल्हापुरातून जवळपास पाच हजारांवर कलावंत चित्रपट, नाटकाशी जोडले आहेत. रोजगार येथे भक्कम करावा लागेल त्यासाठी चित्रनगरीचा जरूर विकास करू मात्र कोल्हापूर - मुंबई - कोल्हापूर - मद्रास अशी विमान सेवा सुरू झाल्यास चित्रीकरणाच्या कामाला अधिक बळकटी मिळून रोजगार वाढण्याची येथे संधी आहे. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनीही पुढाकार घ्यावा असे श्री. देशमुख यांनी सांगितले.

म्हणून स्पर्धा कोल्हापुरात
राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी सोलापूर, औरंगाबाद, लातूर, मुंबई, येथून आमंत्रणे आली होती; मात्र कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापुरात घेतल्याचे देशमुख यांनी सांगितले

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55806 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top