वामन मेश्राम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वामन मेश्राम
वामन मेश्राम

वामन मेश्राम

sakal_logo
By

२००८४

नामधारी नेतृत्वाला राजर्षी शाहूंचा विरोध
वामन मेश्राम; मूळ दृष्टिकोन समाजासमोर आणण्याची गरज

कोल्हापूर, ता. ६ ः ‘‘जातीय प्रतिनिधीत्वाला नामधारी नेतृत्व हा पर्याय असू शकत नसल्याने राजर्षी शाहू महाराजांनी त्याला विरोध केला होता. त्यांचा या विषयावरील मूळ दृष्टिकोन समाजासमोर आणण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले. भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा, छत्रपती क्रांती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आयोजीत राज्यस्तरीय समारोप सभेत ते बोलत होते. दसरा चौकात झालेल्या कार्यक्रमाचे उद्‍घाटन प्रा. डॉ. आनंद पाटील यांच्या हस्ते झाले.
मेश्राम म्हणाले, ‘‘सध्याच्या विविध जातीच्या संसदेतील प्रतिनिधींना बोलायला दिले जात नाही. ते कोणाच्या हातचे खेळणे बनले आहे. या नेतृत्वाला संसदेत गुलाम बनवून टाकले आहे. त्यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिअल रिप्रेझेंटेटीव्हसाठी आग्रह होता. गांधीजींचा मात्र त्याला विरोध होता, ही बाब साऱ्यांनी समजून घेतली पाहिजे. तसेच संघटितपणेच लढा देण्याची गरज आहे.’’
स्वातंत्र्याच्या लढाईबाबत ते म्हणाले, ‘‘ब्राह्मणांनी चालवलेल्या कॉंग्रेसने १९३० पर्यंत स्वातंत्र्याबाबतचा ठराव केला नव्हता. स्वातंत्र्याची लढाई ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी नव्हती, तर ती ब्राह्मणांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी होती. त्यामुळे फुले, शाहू तसेच आंबेडकर हे त्यात गेले नाहीत.’’
भारत मुक्ती मोर्चाचे महासचिव डॉ. विलास खरात यांनी शाहूंचे कार्य समाजासमोर येण्यासाठी त्यांचे विपुल प्रमाणात असलेले साहित्य प्रकाशात आणण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी प्रा. डॉ. आनंद पाटील, प्रताप पाटील, नानासाहेब चव्हाण, सुनील शिंदे, श्रीकांत होवाळ यांची भाषणे झाली. यावेळी डॉ. विद्या नागावकर, संगीता शिंदे, इंदिरा पटवर्धन आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55810 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top