गड ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड ३
गड ३

गड ३

sakal_logo
By

20145
शिवनगे ः येथे सेवा संस्थेच्या नूतन संचालकांच्या सत्कार समारंभात व्यासपीठावर बसलेले गोपाळराव पाटील व आमदार राजेश पाटील.
------------------------------
मामा-भाच्याचे नाते दृढ राहील

आमदार राजेश पाटील; गोपाळराव यांचे बोट धरून मी राजकारणात
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. ७ ः मामा-भाच्याचे राजकारण सर्वांना परिचीत आहे. त्याच राजकारणाची आता नवी नांदी आमदार राजेश पाटील व गोपाळराव पाटील ही मामा-भाच्याची जोडी तालुक्याच्या विकासाचा अजेंडा घेऊन काम करते आहे. मामांचा अशीर्वाद पाठीशी असल्याने समाजकार्यात मला कधीही अडचण आली नाही, गोपाळराव पाटील यांचे बोट धरून मी राजकारणात आलो, माझ्या राजकीय व सामाजिक जीवनात त्यांचे मला सहकार्य मिळाल्याचे सांगून आमदार राजेश पाटील यांनी मामा-भाच्याचे नाते दृढ राहील, असा विश्वास व्यक्त केला.
शिवनगे (ता. चंदगड) येथे शिवनगे विकास सेवा संस्थेच्या नूतन संचालकांच्या सत्कार समारंभात आमदार पाटील बोलत होते. गोपाळराव पाटील अध्यक्षस्थांनी होते.
आमदार पाटील म्हणाले, तालुक्याच्या विकासकामात मामा-भाचे कधीही कमी पडणार नाहीत. आम्ही एका व्यासपीठावर आल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी आमचं नातं इथूनपुढेही असेच टिकवून ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. मागच्या गोकुळच्या निवडणुकीत मला निवडून देण्यात गोपाळराव पाटील यांचा वाटा आहे. २०२१ च्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्तानेही माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील व गोपाळराव पाटील यांनी चंदगड मतदारसंघातून मला बिनविरोध निवडून देऊन चांगला पायंडा पाडला. तालुक्यातील सहकार मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांनी त्यावेळी तो निर्णय घेतल्याने तालुक्यातील जवळपास ९५ टक्के विकास सेवा संस्थांच्या निवडणुका बिनविरोध होत आहेत. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केले आहे. विधान सभेत प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान मिळण्याची मागणी जोर लावून धरल्याचे सांगितले तर गोपाळराव पाटील यांनी गोकुळ व केडीसीच्या निवडणुकीत मी राजेश पाटील यांना सहकार्य करून माझे कर्तव्य पार पाडले आहे. इथूनपुढेही तालुक्याच्या विकासासाठी आमचे एकमेकांशी सहकार्याचे संबंध राहतील असे सांगितले.

२१ वर्षांनंतर मामा-भाचे
एका व्यासपीठावर
भाचे आमदार राजेश पाटील व मामा गोपाळराव पाटील अनेक वर्षे वेगवेगळ्या गावांतील व्यासपीठावर एकत्र आले असले तरी गोपाळराव यांच्या शिवनगे या गावात तब्बल २१ वर्षांनंतर दोन्ही मामा-भाचे सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आल्याने स्थानिकांत चर्चा सुरू होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55898 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top