
पोलिस वृत्त
लांजा येथील तरुण
वारणा नदीत तरुण बुडाला
तुरुकवाडी : कोकरुड - मलकापूर मार्गावरील पुलानजीक तुरुकवाडीच्या हद्दीत वारणानदी पात्रात आंघोळीसाठी उतरलेला लांजा येथील तरुण वाहून गेला. प्रशांत पांडुरंग पेंढारे (वय ३३, रा. पेंढारवाडी ता. लांजा) असे संबंधित तरुणाचे नाव आहे.
घटनास्धळावरुन व शाहूवाडी पोलिसातून मिळाळेली माहिती अशी, आज सकाळी प्रशांत मोटारसायकल (एमएच ०८ एए ४८७३) वरुन पेंढारवाडी येथून पुण्याला निघाला होता. तो पुणे येथे एका कंपनीत इंजिनिअर होता. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास तो तुरुकवाडी हद्दीतील वारणानदी पात्रात आंघोळीसाठी उतरला असता पाय घसरून वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत शाहूवाडी पोलिस वारणानदी पात्रात त्याचा शोध घेत होते.
आजऱ्याजवळ दारू पकडली
आजरा ः येथील बुरुडे चौक येथे गोवा बनावटीची दारू आजरा पोलिसांनी जप्त केली. मोटार व दारू असा ३ लाख १२ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांविरोधात गुन्हा नोंद केला. हवालदार अनिल तराळ यांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली आहे. मोटार (एमएच २४ व्ही १६२४) मधून भरत संतू पाटील (वय ४२, हडलगे, ता. गडहिंग्लज) व किसन पांडुरंग येसणे (मडिलगे, ता. आजरा) हे दारू घेऊन महागावच्या दिशेने जात होते. पोलिसांना मोटारीची झडती घेतली असता दारूचे बाॅक्स सापडले. याची किंमत ६२ हजार ६४० रुपये आहे. पाटील व येसणे या दोघांच्या विरोधात आजरा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. यामध्ये पाटील याला ताब्यात घेतले आहे, तर येसणे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. हवालदार संतोष घस्ती अधिक तपास करीत आहेत.
मनपाडळेत मारामारीत पाच जखमी
घुणकी : हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथे प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे नातलगांनी मुलाच्या कुटुंबीयांना केलेल्या मारामारीत पाच जण जखमी झाले. घटनेची नोंद वडगांव पोलिसांत झाली आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मनपाडळे येथील एका तरुणाने प्रेमविवाह केला आहे. शुक्रवारी रात्री मुलीच्या वडिलांनी मुलीची फसवणूक करून विवाह केल्याचा जाब विचारत मुलाच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली. दरम्यान मुलीकडील तिघांनी मुलाच्या कुटुंबीयांना लाथाबुक्कीसह काठीने मारहाण केली. त्यांच्यावर नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. तपास वडगाव पोलीस ठाणेचे सहाय्यक फौजदार दीपक पोळ करीत आहेत.
३०५८
जयसिंगपुरात मोबाईल चोरट्यास अटक
जयसिंगपूर : शहरातील अलका सचिन शिंदे यांच्या बंद घरातून यांचा १९ हजार ५०० रुपयांचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना गुरुवारी (ता. ६) रात्री घडली होती. कॉन्स्टेबल रोहित डावाळे व वैभव सूर्यवंशी यांनी सीसीटीव्ही माध्यमातून तपास करून २४ तासांत संशयित आरोपी अंकित भारत खांडेकर (वय १९, यादवनगर जयसिंगपूर) यास ताब्यात घेतले. त्याने मोबाईल चोरल्याची कबुली दिली आहे. खांडेकरकडून मोबाईल हस्तगत केला. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद वाघ, नाईक असलम मुजावर, कॉन्स्टेबल रोहित डावाळे, वैभव सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.
मारहाणीत जखमी
कोल्हापूर ः खानविलकर पेट्रोल पंप परिसरात झालेल्या मारहाणीत एक जण जखमी झाला. रियाज जैनापूरे असे जखमींचे नाव आहे. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.
जैनापुरात एकाची आत्महत्या
जयसिंगपूर : जैनापूर (ता. शिरोळ) येथे महेश दादासो म्हारनूर (वय २३ रा. कोसारी ता. जत जि.सांगली) या युवकांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. याबाबतची वर्दी दादासो म्हारनुर यानी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.
अपघातात तरुण जखमी
कोल्हापूर ः कणेरीफाटा येथे काल रात्री झालेल्या अपघातात तरूण जखमी झाला. फिरोज शेख (वय २३) असे त्यांचे नाव आहे. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.
मोटारसायकलची चोरी
कोल्हापूर ः कसबा बावडा भाजी मंडई परिसरातून भरदिवसा चोरट्याने मोटारासयकल चोरून नेली. हा प्रकार १६ एप्रिलला घडला. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55941 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..