
रेडक्रॉस दिवस विशेष लेख
जागतिक रेडक्रॉस दिन
20173
रेडक्रॉस संस्थेचे
जिल्ह्यात उल्लेखनीय काम
कोल्हापूर, ता. ७ ः रविवार (ता. ८) हा जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपत्कालीन मदतकार्य आणि आरोग्य सेवा देणारी जगातील संघटना म्हणजे रेड क्रॉस होय. कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे राजर्षी शाहू ब्लड बँक, स्वयंम विशेष मुलांची शाळा, स्वयंम उद्योग केंद्र, स्वयंम सेलिब्रल पाल्सी युनिट हे उपक्रम सुरु आहेत. रेड क्रॉस या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संस्थापक हेनरी ड्यूनान्ट यांचा स्मृतिदिन ८ मे हा दिवस जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. कोणत्याही आपत्तीत सेवा देणाऱ्या लाखो रेडक्रॉस स्वयंसेवकांना या दिवशी मानवंदना देण्यात येते..
कोल्हापूर जिल्हा रेड क्रॉसचे काम
इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे कोल्हापूर जिल्हा शाखा १९८५ पासून कार्यरत आहे. जिल्हाधिकारी हे कोल्हापूर जिल्हा शाखेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. या जिल्हा शाखेतर्फे राजर्षी शाहू ब्लड बँक, स्वयंम विशेष मुलांची शाळा, स्वयंम उद्योग केंद्र, स्वयंम सेलिब्रल पाल्सी युनिट हे उपक्रम सुरु आहेत. स्वयंम स्वयंम विशेष मुलांची शाळा १९९० मध्ये सुरु झाली. सुरुवातीला फक्त सात विशेष विद्यार्थी होते. आज १४० विद्यार्थी आहेत. राजर्षी शाहू ब्लड बँक अनेक वर्षापासून कार्यरत असून अद्यावत मशिनरीसह रक्त संकलन, पुरवठ्याचे काम अनेक वर्षांपासून करत आहे. स्वयंम उद्योग केंद्रात फाईल्स, गणपती मूर्ती, कागदी पिशव्या, पेंटिंग बनवल्या जातात. यामधून विशेष मुलांना स्ववलंबी बनवले जाते. कोल्हापुरात आलेल्या महापुरावेळी सर्वात पहिली मदत कार्य मोहीम न्यू पॅलेस परिसरात ‘रेड क्रॉस’तर्फे सुरु केली. यामध्ये २३०० लोकांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले होते. कोविड काळात जिल्हा रेडक्रॉसने २५ लाखांहून अधिक रकमेच्या वस्तू मदत वितरित केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55949 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..