शिरोली यात्रा लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोली यात्रा लेख
शिरोली यात्रा लेख

शिरोली यात्रा लेख

sakal_logo
By

रौप्यमहोत्सवी आयडियल इंग्लिश स्कूल
-----------
लीड
शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील आयडियल इंग्लिश स्कूल रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. संस्थेची ही वाटचाल म्हणजे सेवाभावी, निष्कलंक व उत्तुंग कर्तृत्वाच्या कामगिरीची यशोगाथा म्हटली पाहिजे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे आयडियल म्हणजे पालकांसाठी आधारवड ठरत असून, ती नावाप्रमाणेच आदर्शवत आहे.
- प्रतिनिधी


आयडियल इंग्लिश स्कूलची स्थापना १९९६ ला डी. एस. घुगरे व मनोहर परीट यांनी केली. ग्रामीण मुलांना इंग्रजी शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने त्यांनी आयडियलची स्थापना केली होती. याच हेतूने त्यांनी मिणचे (ता. हातकणंगले) येथेही शाळा सुरू केली. मिणचे येथील शिक्षण संस्था बहरत गेली. तेथील जबाबदारी वाढली. शिरोलीतील आयडियलकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेना, मात्र आयडियलचे पण वटवृक्षात रूपांतर झाले पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती.
आयडियल सुरक्षित हातात देण्यासाठी त्यांनी योग्य व्यक्तीचा शोध सुरू केला आणि त्यांच्या नजरेत आले, शिरोली हायस्कूलचे क्रीडाशिक्षक आर. एस. पाटील व कबड्डीचे एनआयएस प्रशिक्षक दीपक पाटील ही ‘जय-वीरू’ची जोडी. दोघेही शिक्षक असल्यामुळे आयडियल सुरक्षित हातात दिल्याची भावना श्री. घुगरे व श्री. परीट यांनी व्यक्त केली. आर. एस. पाटील व दीपक पाटील यांनी ही आयडियलची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलीच; त्याचबरोबर शैक्षणिक गुणवत्ताही वाढवली. महत्त्वाकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी, विश्‍वास व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आयडियलला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
एखाद्या संस्थेचा २५ वर्षांचा काळ हा निश्‍चितच अभिमानास्पद असतो. मानवी आयुष्य व संस्थेत २५ व्या वर्षी रौप्य, ५० व्या वर्षी सुवर्ण, साठीला हीरक, पंचाहत्तरीला अमृत आणि शंभरीला शतक महोत्सव साजरा करण्याची पूर्वापार परंपरा आहे. आयडियल म्हणजे अल्प फीमध्ये इंग्रजी शिक्षण देणारी शाळा म्हणून परिचित आहे; मात्र त्यांचा शैक्षणिक गुणवत्तेवर कोणताही परिणाम होऊ दिला जात नाही. विद्यार्थी सर्वगुणसंपन्न असलाच पाहिजे, यासाठी कटाक्षाने प्रयत्न केले जातात. पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञानातही तो पारंगत झाला पाहिजे, यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. शाळेचा दहावीचा निकाल कायम १०० टक्के आहे. येथे शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी आज शासकीय अधिकारी, इंजिनिअर, डॉक्‍टर, शिक्षक, उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. काहीजण परदेशात आहेत. अनेकांनी क्रीडा क्षेत्रात करिअर केले आहे. या सर्वांनी शाळेबरोबर गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
विद्यार्थ्यांना शाळाबाह्य शिक्षण मिळावे, यासाठी प्रत्येकवर्षी क्षेत्रभेटीचे आयोजन केले जाते. यात शासकीय कार्यालय, बाजार, रुग्णालय, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, कारखाने आदी ठिकाणी भेटी दिल्या जातात. पर्यावरण अभ्यासासाठी पावसाळ्यात ट्रेकिंगचे आयोजन केले जाते. महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजऱ्या केल्या जातात. भारतीय सणांची ओळख व्हावी म्हणून शाळेत सण-उत्सव साजरे केले जातात. विद्यार्थ्यांनी खेळातही उल्लेखनीय यश मिळवले आहे. बेसबॉल, सॉफ्टबॉल, कबड्डी अशा विविध खेळांत विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवले आहे.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी साप्ताहिक, बाह्य परीक्षांचे आयोजन केले जाते. संगणक प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांसाठी मोफत समर कॅम्पचे आयोजन केले जाते. क्रीडा महोत्सव, स्नेहसंमेलन, विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना चालना दिली जाते.
-------------
कोट
इंग्रजी शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून सहज व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहे.
-आर. एस. पाटील, अध्यक्ष, आयडियल इंग्लिश स्कूल
---
शिक्षण कार्याचा कणा म्हणजे शिक्षक. त्यामुळे शाळेतील सर्व शिक्षक आदर्शवत व प्रयोगशील असावेत, यासाठी आग्रह असतो.
- दीपक पाटील, सचिव, आयडियल इंग्लिश स्कूल
---
चौकट
पालक सांगतात...
संस्‍थेचे अध्यक्ष आर. एस. पाटील, सचिव दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतून अष्टपैलू विद्यार्थी घडत आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे, अशा प्रतिक्रिया पालकांतून व्यक्त होत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55969 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top