
पाणी पुरवठा
ए, बी वॉर्डात उद्या
पाणीपुरवठा खंडित
कोल्हापूर, ता. ७ ः महावितरणकडून तांत्रिक कामासाठी बालिंगा जल उपसा केंद्राकडील विद्युतपुरवठा सोमवारी (ता. ९) बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी, या काळात पाणी उपसा प्रक्रिया बंद राहणार आहे. त्यामुळे बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागात सोमवारी पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
ए, बी वॉर्ड त्यास संलग्न उपनगरे, ग्रामीण भाग व शहरांतर्गत येणाऱ्या लक्षतीर्थ वसाहत परिसर, संपूर्ण फुलेवाडी व फुलेवाडी रिंगरोड परिसर, सानेगुरुजी परिसर, राजेसंभाजी परिसर, क्रशर चौक परिसर, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर परिसर, कणेरकरनगर परिसर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद परिसर, टेंभे रोड परिसर, शिवाजी पेठ परिसर, चंद्रेश्वर गल्ली परिसर, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर परिसर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, अंबाबाई मंदिर परिसर, मिरजकर तिकटी परिसर, भारत डेअरी परिसर, महाद्वार रोड परिसर, मंगळवार पेठ काही भागांचा समावेश आहे. संपूर्ण सी, डी वॉर्डमधील दुधाळी परिसर, गंगावेश परिसर, उत्तरेश्वर पेठ परिसर, शुक्रवार पेठ परिसर, ब्रह्मपुरी परिसर, बुधवार पेठ तालीम परिसर, सिद्धार्थनगर परिसर, दसरा चौक परिसर, पापाची तिकटी परिसर, लक्ष्मीपुरी परिसर, शनिवार पेठ चौक परिसर, सोमवार पेठ परिसर, ट्रेझरी ऑफिस परिसर, बिंदू चौक परिसर, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक परिसर, रविवार पेठ परिसर, उमा टॉकिज परिसर, गुजरी परिसर, देवल क्लब परिसरात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. मंगळवारी (ता. १०) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55971 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..