
रंग- शिल्पसौंदर्य
लोगो- शिल्पसौंदर्य
20193
परखड विचारांचा वारसा,
माधवराव बागल यांचे शिल्प
शहरातून शिवाजी विद्यापीठाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर किंवा श्री शाहू छत्रपती मिलसमोरील सर्कलमध्ये एक पुतळा आजही दिमाखात उभा आहे. सर्कलमध्ये आत फारसे कोण जात नाही आणि त्यामुळे नव्या पिढीला तर हा पुतळा कोणाचा? हे फारसे माहिती नाही. तर हा आहे, भाई माधवराव बागल यांचा पुतळा. सर्व बाजूंनी काळा दगडातील पिंचींग केलेल्या उंचवट्यावर मध्यभागी असणाऱ्या चौकोनी आकार स्तंभावर असलेला हा पुतळा आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्यानंतर क्रांतिकारी समाजसुधारक म्हणून त्यांची ओळख. अनेक समाजनायकांचे पुतळे त्यांच्या हयातीत बसवले जातात. त्यापैकीच एक भाई माधवराव बागल यांचेही शिल्प. स्वतः एक उच्चशिक्षित शिल्पकार असणारे, मुंबईच्या जे. जे. कला महाविद्यालयात शिक्षण घेतलेले आणि पुढे डाव्या विचाराच्या सखोल अभ्यासातून त्यांचे परखड पुरोगामी विचार विकसित होत गेले. साहजिकच हे विचार समजून येतील अशा पद्धतीचे अत्यंत बोल्ड काम शिल्पकारांनी हे शिल्प घडवताना केले आहे. डोक्यावर असणारी फरची टोपी गळ्यातील स्कार्फ आणि अंगात घातलेला कोट दर्शवताना शिल्पकारांनी चेहरा काहीसा डाव्या बाजूस बघत असलेला दर्शवून भाई माधवराव बागल यांचा दृष्टिकोन सुचित केला आहे. महात्मा गांधींनी कोल्हापूरला १९२६ मध्ये पहिली भेट दिली. तेंव्हापासून भाई माधवराव बागल देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय झाले. १९३७ मध्ये त्यांनी प्रजा परिषदेची स्थापना केली. अनेक आंदोलने त्यांनी केली होती. कर्मकांड आणि बुवाबाजीवर त्यांनी आपल्या लेखणीतून परखडपणे प्रहार केला. त्याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे त्यांच्या हयातीत त्यांचा बिंदू चौकात देशातील पहिला पुतळा बसवण्यासाठी भाई माधवराव बागल यांनीच पुढाकार घेतला होता.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55988 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..