
शिवाजी तरुण मंडळ साखळी फेरीत
फोटो 20245
शिवाजी मंडळ साखळी फेरीत
कोल्हापूर, ता. ७ : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळ संघाने संयुक्त जुना बुधवार तालीम संघावर २ - ० ने विजय मिळवला. छत्रपती शाहू स्टेडियम येथे स्पर्धा सुरू आहे.
शिवाजी मंडळाने शनिवारच्या सामन्यात वर्चस्व राखले. सामन्यात मंडळाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. चाली रचत प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना हलते ठेवले. लॉन्ग पासच्या जोरावर सामन्यात वर्चस्व राखले. यातच ३५ व्या मिनिटाला संकेत साळोखे याने गोल नोंदवत सामन्यात १ - ० अशी आघाडी घेतली. जुना बुधवार संघाने केलेले प्रयत्न वाया गेले. उत्तरार्धात जुना बुधवारने काही आक्रमक चढाया केल्या. मंडळाच्या खेळाडूंवर काही अंशी दबाव निर्माण करण्यात देखील यश मिळवले; मात्र मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर होऊ शकले नाही. सामन्याच्या ४८ व्या मिनिटाला बुधवारच्या रोहित सुतार याचा मोठ्या डीमध्ये हॅण्डबॉल झाल्याने मंडळाला पेनल्टी बहाल करण्यात आली. या संधीचा फायदा घेत विक्रम शिंदे याने गोल नोंदवत संघाला २ - ० अशी विजयी आघाडी मिळवून देत स्पर्धेच्या साखळी फेरीत प्रवेश केला.
आजचे सामने
दुपारी चार - दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध झुंजार क्लब
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56005 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..