कृतज्ञता स्टार्टअप निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृतज्ञता स्टार्टअप निकाल
कृतज्ञता स्टार्टअप निकाल

कृतज्ञता स्टार्टअप निकाल

sakal_logo
By

२०२१९

खाडे, कुंभोजकर, चौगुलेंसह
पटवर्धनांच्या इनोव्हेशन्सना पुरस्कार
कृतज्ञता पर्वांतर्गत स्टार्टअप व इनोव्हेशन फेस्टिव्हल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी कृतज्ञता पर्वांतर्गत झालेल्या स्टार्टअप-इनोव्हेशन फेस्टिव्हलमधील विजेत्यांची नुकतीच निवड झाली. उत्कृष्ट उत्पादनासाठी आर. एन. रोबोटिक्सचे विश्वजित खाडे, सकृत हार्वेस्टरचे नितीन कुंभोजकर व नोकरी महामंडळाचे धवल चौगुले, महिलांमध्ये सागरिका पटवर्धन यांच्या इनोव्हेशन्सना गौरवण्यात आले.
श्री. खाडे यांना एक लाख, श्री. कुंभोजकर यांना पंच्याहत्तर हजार, श्री. चौगुले यांना पन्नास हजारांचे पारितोषिक देण्यात आले. फेस्टिव्हलसाठी ३२५ नावीन्यपूर्ण इनोव्हेशन्सपैकी १०९ इनोव्हेशन्सची निवड झाली होती. जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, शिवाजी विद्यापीठ आणि सिबिक बिझनेस इन्कुबेटर यांच्या सहभागातून फेस्टिव्हलचे आयोजन झाले. महाराष्ट्र स्टेट फेस्टिव्हल सोसायटी या संस्थेच्या तज्ज्ञ प्रतिनिधींकडून विजेत्यांची निवड झाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले. पहिल्या तीन क्रमांकांना प्रत्येकी दहा लाखांचे शासकीय अनुदान देण्‍यार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. पी. एस. पाटील, चंद्रशेखर डोली, श्री. पेंडसे, एम. वाय. पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56017 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top