केंद्रीय शीघ्र कृतीदल कोल्हापुरात दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय शीघ्र कृतीदल कोल्हापुरात दाखल
केंद्रीय शीघ्र कृतीदल कोल्हापुरात दाखल

केंद्रीय शीघ्र कृतीदल कोल्हापुरात दाखल

sakal_logo
By

२०२३६

शीघ्र कृती दल कोल्हापुरात
सात दिवस राहणार मुक्काम; भौगोलिक परिस्थितीची घेणार माहिती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः अनुचित प्रकार घडल्यास घटनास्थळी तातडीने पोहोचता यावे याबाबत जिल्ह्याची भौगोलिक माहिती घेण्यासाठी केंद्री शीघ्र कृती दलाचे पथक कोल्हापुरात दाखल झाले. जिल्ह्यात सात दिवस पथक पहाणी करणार आहे. या संबंधीचा अहवालही वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येणार असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.
केंदीय राखीव दलाअंतर्गत शीघ्र कृती नवी मुंबईत कार्यरत आहे. यासाठी विविध पथके स्थापन केली आहेत. राज्यातील सर्वच जिल्ह्यात जाऊन संवेदनशील आणि पूरस्थितीच्या भागाची पाहणी पथकाकडून केली जात आहे. इचलकरंजी, हातकंणगले, शिरोळ, जोतीबा, गडहिंग्लज आदी ठिकाणी ही पाहणी करण्यात येणार आहे.
दरम्यान आज शहरातील अंबाबाई मंदिर परिसरात, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, सदर बाजार, शाहूपुरी, राजारामपुरी आदी भागात दलाने पाहणी केली. पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी केली. दर दोन वर्षाला संबंधित पथकांकडून अशी पाहणी केली जाते. असिस्टंट कमांडर दीपक कृमार गुरवे, पोलिस निरीक्षक रामसिंग मिना यांच्यासह ७० ही तुकडी पहाणी करीत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56032 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top