
अंबाबाई मंदिर फरशी काम
२०२१६
अंबाबाई मंदिराचे मूळ शिल्पसौंदर्य खुले
कोरीव नक्षीकाम; संगमरवरी फरशी काढण्याचे काम महिनाभरात पूर्ण होण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात बसवलेली संगमरवरी फरशी काढण्याचे काम गतीने सुरू असून महिनाभरात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. एकूण कामापैकी तीस ते पस्तीस टक्के काम पूर्ण झाले असून संगमरवरी फरशीखालील काळ्या पाषाणातील विविध प्रकारचे नक्षीकाम आणि शिल्पसौंदर्य पुन्हा खुले होऊ लागले आहे.
मंदिरात १९७६ मध्ये गाभाऱ्यातील प्रदक्षिणा मार्ग, बाजूचे सर्व खांब, जमीन या परिसरात संगमरवरी फरशी बसवली. कालांतराने मंदिरातील मूळ सौंदर्याला बाधा पोहोचत असून, गाभाऱ्यातील आर्द्रता वाढत असल्याच्या कारणाने संगमरवरी फरशी काढली जावी, अशा सूचना आल्या. त्यानुसार अगोदर प्रदक्षिणा मार्गावरील फरश्या हटवल्या, तर आता गाभाऱ्यातील खांबांलगतच्या भिंतीच्या, आडव्या फरश्या हटवण्याचे काम सुरू आहे. कोणत्याही मशीनशिवाय केवळ छन्नी-हातोड्याचा वापर करून काम सुरू असल्याचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56049 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..