घुडणपीर दर्गा उरूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घुडणपीर दर्गा उरूस
घुडणपीर दर्गा उरूस

घुडणपीर दर्गा उरूस

sakal_logo
By

घुडणपीर दर्गा
उरूसाला प्रारंभ
गंधरात्र उत्साहात, आज गलेफ मिरवणूक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः येथील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या हजरत सय्यद मुबारक घुडणपीर दर्ग्याच्या उरूसाला आजपासून प्रारंभ झाला. रात्री साडेनऊ वाजता पारंपरिक उत्साहात गंध (संदल) लावण्याचा विधी झाला. उद्या (रविवारी) रात्री दहा वाजता गलेफ मिरवणूक निघणार आहे. शाहूकालीन परंपरेनुसार जुना राजवाडा भोसलेवाडा येथे जावून तेथे पठण व विविध धार्मिक विधी होतील. त्यानंतर भोसले कुटुंबीयांसह पारंपरिक लवाजम्यासह वाद्यांच्या गजरात दर्ग्यात मिरवणूकीने गलेफ आणला जाईल आणि त्यानंतर तो विधीपूर्वक चढवला जाईल. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन दर्गा उरूस समितीचे अध्यक्ष हाजी लियाकत मुजावर, मुन्ना मुजावर, इम्रान मुजावर, नजीर मुजावर, वजीर मुजावर, बशीर मुजावर, बाबा कडणे आदींनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56050 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top