राष्ट्रीय लोक अदालत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय लोक अदालत
राष्ट्रीय लोक अदालत

राष्ट्रीय लोक अदालत

sakal_logo
By

जिल्ह्यात १९५१ खटले निकाली
राष्ट्रीय लोकअदालत; २२ कोटीहून अधिकची तडजोड; उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १९५१ खटले निकाली निकाले. यामध्ये २२ कोटीहून अधिकची तडजोड रक्कम मंजूर करण्यात आली.
जिल्ह्यात आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती व्ही. व्ही. जोशी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधिश पंकज देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीष खडके, महाराष्ट्र अँन्ड गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विवेक घाटगे, जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल, न्यायालयीन कर्मचारी, लॉ कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते. न्यायालयात प्रलंबित असणारे खटले तडजोडीने निकाली काढण्याची संधी या निमित्याने उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लोकअदालत दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, सहकार, कामगार, कौटुंबिक न्यायालयात घेण्यात आली. त्यासाठी जिल्ह्यात १३ विधी सेवा समिती आणि ६१ पॅनेलद्वारे याचे कामकाज चालले. यामध्ये पती पत्नीच्या वादाचे ३६ खटले तडजोडीने मिटवून पुन्हा त्यांचे संसार फुलविण्यात आले.

मोटार अपघात तडजोडी
लोकअदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाईचा एक दावा तडजोड होऊन त्याची ७४ लाख रुपयांच्या रकमेचा धनादेश संबधित विमा कंपनीने अर्जदाराला दिला. दुसऱ्या नुकसान भरपाईच्या दाव्यात तडजोड झालेली ५५ लाख ५० हजारांची रक्कम विमा कंपनीकडून अर्जदार महिलेला दिल्याचे विधी सेवा प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

दृष्टिक्षेपात
प्रलंबित खटले - १०५९
तडजोड रक्कम - २० कोटी १५ लाख ७८ हजार २८८ रुपये
दाखल पूर्व खटले - ८९२
तडजोड रक्कम - १ कोटी ८६ लाख ९० हजार ५८६ रुपये
एकूण तडजोड रक्कम - २२ कोटी २ लाख ६८ हजार ८७४ रुपये

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56054 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top