कुदनूर शाळेस घाटगेंतर्फे देणगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुदनूर शाळेस घाटगेंतर्फे देणगी
कुदनूर शाळेस घाटगेंतर्फे देणगी

कुदनूर शाळेस घाटगेंतर्फे देणगी

sakal_logo
By

20260
कुदनूर : मराठी शाळेच्या आवारतील विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी उपस्थित मान्यवर.

कुदनूर शाळेस घाटगेंतर्फे देणगी
कुदनूर : येथील कन्या विद्यामंदिराच्या परिसराची भौतिक गरज ओळखून कुदनूर येथील दादा डेव्हलपर्सचे सुरेश घाटगे यांनी शाळेला साडेचार लाखांची देणगी दिली आहे. राजर्षी शाहू महाराजांचा १०० वा स्मृतिदिन व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छापर कार्यक्रमात शाळेत सुशोभीकरण कामांचा प्रारंभ झाला. शाळेस फरशी बसवून दिल्याबद्दल मुख्याध्यापक राजू डोणकरी यांचाही सत्कार झाला. देणगीबद्दल सुरेश घाटगे यांचा शालेय व्यवस्थापन समितीतर्फे सत्कार झाला. सिद्धेश्‍वर सेवा सोसायटीचे अध्यक्ष पुंडलिक कोकीतकर, उपाध्यक्ष शशिकांत सुतार व कोरोना काळात सर्वात्कृष्ट सेवा बजावणाऱ्या आरोग्य कर्मचारी, शिक्षक व अंगणवाडी सेविकांचाही गौरव करण्यात आला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पवार, रामचंद्र बामणे, शोभा शहापूरकर, गफुर कालकुंद्रीकर, दिग्विजय खवणेवाडकर, हुसेन जमादार, रवळू परीट, शिक्षक, समितीच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56078 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top