जास्तीची मजूरी देऊनही हमाल मिळेनात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जास्तीची मजूरी देऊनही हमाल मिळेनात
जास्तीची मजूरी देऊनही हमाल मिळेनात

जास्तीची मजूरी देऊनही हमाल मिळेनात

sakal_logo
By

20302


जास्तीची मजूरी देऊनही
हमाल मिळेनात
माल घेऊन आलेले ट्रक तातकळत
अशोक पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. ११ : दिवसेंदिवस कोवाड बाजार पेठेचा विस्तार वाढत आहे. पण हमाल मजूरांची टंचाई व्यापारी वर्गाला भासत आहे. जास्तीची मजूरी देऊनही हमाल मिळेनासे झाले आहेत. यामुळे माल घेऊन आलेला ट्रक तासंतास तातकळत थांबत असून दुकान मालकांची हमालांच्या शोधार्थ धावपळ होत आहे.
उद्योग व्यवसायात किती तंत्रज्ञानाचा सहभाग वाढला तरी छोट्या, मोठ्या व्यापाऱ्यांना हमालांची गरज भासते. मालाची ने-आण करणे, ट्रक, टॅंपोतून माल उतरविणे तसेच दुकानातील माल वाहनातून भरणे याकामासाठी हमालांचा गरज भासतेच. अधिक कष्टाचे व श्रमाचे हे काम आहे. या नव्याने लोक क्षेत्राकडे वळलेले नाहीत. व्यापाऱ्यांना हा नवा प्रश्‍न भेडसावत आहे. शहरी भागात काही ठिकाणी मशिनच्या सहाय्याने ही कामे केली जात असली तरी ग्रामीण भागात मात्र व्यापारी वर्गाला हमाल, मजूरांशिवाय पर्याय नाही. खत व्यापारी, सिमेंट, लोखंड, विटा व भात खरेदी-विक्री व्यवसायातील व्यापाऱ्यांना मालवाहू मजूरांची खरी गरज भासते. पण अलिकडे मजूर मिळत नसल्याने दुकानाच्या दरवाजात माल घेऊन आलेली ट्रक खाली करण्यासाठी मालकाला हमालांची शोधा-शोध करण्याची वेळ येत आहे. हमाल आले नाहीत तर मालाचे ट्रक तसेच उभे राहतात. त्यामुळे त्याचा अर्थिक बुर्दंड व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. वेळत ट्रक खाली होत नसल्याने चालक व मालकांत वादाचे प्रकार घडत आहेत. काही कंपन्यानीही वाहनातील माल वेळत खाली होत नसल्याने माल पाठविणे बंद केल्याचे व्यापाऱ्यांतून समजते. जास्तीची मजूरी देऊनही हमाल मिळत नसल्याने व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न या व्यापाऱ्यांपुढे आहे.
-----------------
कोट
गेल्या वीस वर्षापासून मी खताचा व्यापार करतो. खत विक्रीच्या व्यवसायात हमालांची फार मोठी गरज भासते. गेल्या आठ ते दहा वर्षापासून हमालांची टंचाई प्रकर्षाने जाणवत आहे.
- सचिन पाटील, साई शेती सेवा केंद्र, कोवाड

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56123 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top