आजरा अर्बन बॅंकेच्या तारळे शाखेत एटीएम सेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा अर्बन बॅंकेच्या तारळे शाखेत एटीएम सेवा
आजरा अर्बन बॅंकेच्या तारळे शाखेत एटीएम सेवा

आजरा अर्बन बॅंकेच्या तारळे शाखेत एटीएम सेवा

sakal_logo
By

20600
क. तारळे (ता. राधानगरी) : येथील आजरा अर्बन बॅंकेच्या शाखेत एटीएम सेवेचा प्रारंभ करताना संचालिका शैला टोपले. या वेळी अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, उपाध्यक्ष किशोर भुसारी, संचालक व मान्यवर.

आजरा अर्बन बॅंकेच्या
तारळे शाखेत एटीएम सेवा
आजरा, ता. ९ : दि. आजरा अर्बन बॅंकेच्या तारळे (ता. राधानगरी) शाखेच्या एटीएम सेंटरचा प्रारंभ संचालिका शैला टोपले यांच्या हस्ते झाला. अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख व संचालक अशोक चराटी, सरपंच अशोक कांबळे, भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष संजयसिंह पाटील, विद्यमान संचालक रवींद्र पाटील, माजी संचालक शिवाजी पाटील, माजी सभापती दत्तात्रय पाटील, संग्राम पाटील, मानसिंग पाटील, अॅड. उमेश पाटील प्रमुख उपस्थित होते.
चराटी यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी बॅंकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. एटीएम सेंटरमुळे गावातील नागरिकांची सोय होणार आहे. येथे सर्व बॅंकाची एटीएम चालणार आहेत. बॅंकेला शेड्युल दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही चराटी यांनी स्पष्ट केले. या वेळी बॅंकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, उपाध्यक्ष किशोर भुसारी, संचालक सुरेश डांग, विलास नाईक, प्रकाश वाटवे, डॉ. दीपक सातोसकर, रमेश कुरुणकर, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, प्रणिता केसरकर, अस्मिता सबनिस, सूर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, अॅड. सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे, शाखा मार्गदर्शक अनंत तेली, गजानन पोतदार, राहुल वणकुद्रे, राजाराम पोतदार, विजय महाजन, राजाराम भाटले, दत्तात्रय निल्ले, मारुती पारकर, जोतिराम सूर्यवंशी पाटील, सदाशिव पाटील, रवींद्र जाधव ग्रामस्थ, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56348 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top