सर्फनालातील घर, गावठाणची संपादन प्रक्रिया अन्यायकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्फनालातील घर, गावठाणची संपादन प्रक्रिया अन्यायकारक
सर्फनालातील घर, गावठाणची संपादन प्रक्रिया अन्यायकारक

सर्फनालातील घर, गावठाणची संपादन प्रक्रिया अन्यायकारक

sakal_logo
By

सर्फनालातील संपादन प्रक्रिया अन्यायकारक
प्रकल्पग्रस्तांकडून चौकशीची मागणी; घर, गावठाणबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ९ : सर्फनाला प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या पारपोली गावठाण हद्दीती घरांची व जमिनींची संपादन प्रक्रिया चालू आहे. यांची संयुक्त मोजणी झालेली असून ही प्रक्रिया सदोष व गरीब प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करणारी आहे. याची चौकशी होवून संयुक्त मोजणी संपादन प्रक्रियेतील झालेली चुक दुरुस्त होवून न्याय रितीने संपादन प्रक्रिया व्हावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, सर्फनाल प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात पारपोली व पारपोली पैकी खेडगे व गावठाण ही तीन गावे येतात. या गावातील शेतजमिनीचे संपादन यापुर्वीच झाले असून पारपोली व गावठाण या गावच्या गावठाण हद्दीतील घरे व जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे सुरु आहे. या प्रक्रियेत दोष असून चुकीच्या पध्दतीने सर्व्हेक्षण झाले आहे. उपविभागीय अधिाकारी कार्यालय गारगोटी यांनी याची माहिती प्रत गावचावडीवर लावली आहे. यामध्ये सर्व्हेक्षण केलेल्या नोंदी या चुकीच्या आहेत. गावठाण हद्दीलगत असलेल्या व पुर्वी संपादन केलेले सर्व्हेनंबरमधील जमिनी व घरे यांची नोंद या सर्वेक्षणात घातली आहेत. त्याच वेळी गावठाण हद्दीतील संपादन न झालेली घरे व जमिनी मात्र वगळलेली आहेत. पुर्वी संपादन झालेली व ज्याचे पैसेही वाटप झाले आहेत अशा सर्वे नंबरमधील घरे व जमिनीचे भूमीअभिलेख कर्मचाऱ्यांनी या सर्व्हेत नोंद घातली आहे हे पुर्णतः कायदा मोडणार आहे. एका बाजूला गावठाण हद्दीबाहेरील सर्व्हे नंबरमधील संपादित जमिनी व घर पुन्हा संपादनात घेतली जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला गावठाण हद्दीतील संपादन न झालेली घरे व पडसर जमिनी वगळल्या आहेत. हे चुकीचे असून पाटबंधारे व भूमी अभिलेख कार्यातील कर्मचाऱ्यांनी जाणीवपुर्वक शासनाची फसवणुक केली आहे. हा प्रकल्पग्रस्तांवर अन्याय आहे. त्यामुळे या संपुर्ण सर्व्हेक्षणाची चौकशी होवून झालेली चुक दुरुस्त करून त्या पध्दतीने संपादन व्हावे. निवेदनावर अमरजीत नारायण ढोकरे, एकनाथ महादेव शेटगे, अशोक नारायण मालव, तुकाराम विष्णु गुंजाळ, निवृत्ती सिताराम शेटगे, प्रकाश तुकाराम शेटगे, अर्जुन परसु शेटगे, यांच्यासह नव्वद प्रकल्पग्रस्तांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-------
चौकट
शिर्केवाडीच्या निवाड्यास स्थिगिती द्या...
दरम्यान, शिर्केवाडी गावठाणच्या सर्व्हेची प्रत्यक्षात दुरूस्ती होत नाही. तोपर्यंत (जी. एम. सी.) निवाड्यास स्थिगिती देणेत यावी व याबाबत लवकर बैठक व्हावी, अशीही मागणी निवेदनातून केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56356 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top