पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू ः मंत्री हसन मुश्रीफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू ः मंत्री हसन मुश्रीफ
पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू ः मंत्री हसन मुश्रीफ

पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू ः मंत्री हसन मुश्रीफ

sakal_logo
By

20493
गडहिंग्लज : भीमनगरमधील कार्यक्रमात बोलताना हसन मुश्रीफ. व्यासपीठावर प्रा. किसनराव कुराडे, किरण कदम, शर्मिली मालंडकर, उदय जोशी व इतर.

पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू
मंत्री हसन मुश्रीफ; गडहिंग्लज भीमनगरमध्ये विकासकामांचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : गडहिंग्लज नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवू, असा निर्धार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. तसेच आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांच्या महाविकास आघाडी निर्मितीचेही सुतोवाच त्यांनी या वेळी केले.
येथील भीमनगरमध्ये आयोजित विकासकामांच्या उद्‍घाटनासह बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रा. कुराडे म्हणाले, ‘‘मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामुळेच गडहिंग्लज शहर विकासाच्या वाटेवर आले आहे. भविष्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करुया.’’ किरण कदम म्हणाले, ‘‘हसन मुश्रीफ यांनी गेल्या पाच वर्षात शहर विकासासाठी ३३ कोटीचा निधी दिला आहे.’’ शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने म्हणाले, ‘‘जनता दलाच्या सत्ताधाऱ्यांनी नागरिकांकडून केवळ करांच्या रुपाने आलेला पैसाच विकास कामावर खर्च केला असून नवीन कोणतीही योजना आणली नाही.’’
नगरसेवक रेश्मा कांबळे म्हणाल्या, ‘‘मुश्रीफ यानी बांधकाम कामगारांच्या आयुष्याचे कोटकल्याण करणाऱ्या योजना राबविल्या. बांधकाम कामगारांच्या लग्नापासून ते त्यांच्या मुलांचा जन्म, त्यांचे शिक्षण, आरोग्य, घर बांधकामासाठी अर्थसाह्य दिले जात आहे.’’
युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे, हारुण सय्यद यांची भाषणे झाली. जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सतीश पाटील-गिजवणेकर, उदय जोशी, शर्मिली मालंडकर, शारदा आजरी, उदय परीट, संतोष कांबळे, राजशेखर दड्डी, सुरेश कोळकी, रामगोंडा उर्फ गुंडू पाटील उपस्थित होते.
----------
चौकट
चटका पायाला व काळजाला
सलवादे म्हणाले, ‘‘मंत्री मुश्रीफ यांनी गाडीतून उतरताच विचारले, हा एक रस्ता का झाला नाही?. आता हा रस्ता नियोजनात धरल्याचे मी सांगितले. खराब रस्त्यामुळे जनतेच्या पायाला बसणारे चटके हे मंत्री मुश्रीफ यांच्या काळजालाही बसतात. एवढी त्यांची जनतेशी एकरुपता झाल्याने जनतेच्या प्रश्‍नांची त्यांना जाण आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56392 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top