
कष्टकरी शेतमजुर संघटनेतर्फे ठिय्या
20566
-----
कष्टकरी शेतमजूर संघटनेतर्फे ठिय्या
इचलकरंजी, ता.९ ः रेशन कार्ड विभक्त केलेल्या नागरिकांना धान्य मिळावे, जिवंत लाभार्थ्यांना हयातीच्या दाखल्यासाठी सक्ती करू नये, लाभार्थ्यांना मिळणारी पेन्शन वाढवून महिना तीन हजार रुपये करावी, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचे नेतृत्व विश्वास बालिघाटे, सुरेश सासणे आदी करीत आहेत.
संजय गांधी योजनेमधील लाभार्थ्यांच्या वयाची अट ६५ वरुन ६० वर्षे करावी, उत्पन्नाचा दाखला ५० हजारांच्या आतील करावा, शेतमजुरांचे महामंडळ तयार करावे, पेन्शन मंजूर होवूनही मिळाली नसल्याने त्याची चौकशी व्हावी, २०२१ च्या महापुरात झालेल्या नुकसानीची भरपाई २०१९ प्रमाणे द्यावी, शिरोळ तालुक्यातील लाभार्थ्यांची ९२ प्रकरणे ऑनलाईन केली असतानाही त्याचा तपास लागत नसल्याने त्याची चौकशी करावी, या मागण्याही आंदोलकांनी केल्या आहेत. आंदोलनात शिवाजी कोळी, सिकंदर नदाफ, लक्ष्मण डकरे, शोभा पंजारे आदींसह सुमारे १५० हून अधिक पेन्शनधारक सहभागी होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56451 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..