संस्था गटातील ठरावांचे त्रांगडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संस्था गटातील ठरावांचे त्रांगडे
संस्था गटातील ठरावांचे त्रांगडे

संस्था गटातील ठरावांचे त्रांगडे

sakal_logo
By

लोगो : गोडसाखर निवडणूक

संस्था गटातील ठरावांचे त्रांगडे
संस्था एक, ठराव दोन; सहकारी संस्थांतील सत्तांतरामुळे प्रश्‍न
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची (गोडसाखर) प्रारुप मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी संस्था गटातील ठराव दाखल केले जात आहेत. मात्र, या ठरावांचे त्रांगडे झाले आहे. ठराव दाखल करण्याच्या मुदतीत काही विकास सेवा संस्था, पतसंस्थांच्या निवडणुका होऊन सत्तांतर झाले आहे. निवडणुकीपूर्वी जुन्या आणि सत्तांतरानंतर नव्या संचालक मंडळाने ठराव दाखल केल्याने संस्था एक आणि ठराव दोन अशी परिस्थिती उद्भवली आहे. यातील कोणाला मताचा अधिकार मिळणार, हे सुनावणीतच ठरणार आहे.
गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रारुप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. संस्था गटात २५१ सहकारी संस्था सभासद आहेत. यामध्ये विकास सेवा संस्था, पतसंस्था, दूध संस्थांचा समावेश आहे. कारखान्याच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार कोणाला द्यायचा यासाठी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक घ्यावी लागते. या बैठकीत नाव निश्चित करुन सदर व्यक्तीच्या नावे ठराव करावा लागतो. त्याची प्रत सादर करावी लागते. संस्था गटासाठी ठराव दाखल करण्याला २१ एप्रिलला सुरवात झाली. २० मे पर्यंत त्याची मदत आहे.
दरम्यान, विविध कारणानी लांबणीवर पडललेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांची सध्या रणधुमाळी सुरू आहे. २१ एप्रिलपासून काही विकास सेवा संस्था, पतसंस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी अस्तित्वात असलेल्या संचालक मंडळाने गडहिंग्लज साखर कारखान्यासाठी संस्था गटात ठराव दाखल केला आहे. मात्र, काही संस्थात निवडणुकीनंतर सत्तांतर झाले. अध्यक्ष निवडीनंतर संचालक मंडळाला अधिकार प्राप्त होतो. त्यामुळे नव्याने सत्तेत आलेल्या संचालक मंडळाकडूनही ठराव दिला जात आहे. परिणामी, संस्था एक आणि ठराव दोन अशी परिस्थिती उद्भवली आहे. अशा दुबार ठराव दाखल झालेल्या संस्थाबाबत साखर संचालकांसमोर सुनावणी होईल. मताचा अधिकार नेमका कोणाला प्राप्त होणार हे सुनावणीतच स्पष्ट होणार आहे.

चौकट...
* कोल्हापूरला होतोय फेरा...
गडहिंग्लज साखर कारखान्याचा कारभार सध्या प्रशासक मंडळ पहात आहेत. प्रशासक मंडळातील अधिकाऱ्यांची मूळ नियुक्ती कोल्हापूर येथे आहे. त्यामुळे संस्था गटातील ठराव दाखल करण्याची व्यवस्थाही कोल्हापूर येथेच करण्यात आलेली आहे. परिणामी, सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना ठराव दाखल करण्यासाठी कोल्हापूरचा फेरा करावा लागत आहे. त्यात वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. त्याबद्दल ठरावधारकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56456 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top