‘साई’च्या विद्यार्थ्यांची सामानगडला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘साई’च्या विद्यार्थ्यांची सामानगडला भेट
‘साई’च्या विद्यार्थ्यांची सामानगडला भेट

‘साई’च्या विद्यार्थ्यांची सामानगडला भेट

sakal_logo
By

20572
किल्ले सामानगड : साई इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक किल्ले सामानगडला भेट देऊन इतिहासाची माहिती घेतली.

‘साई’च्या विद्यार्थ्यांची सामानगडला भेट
गडहिंग्लज : शेंद्री येथील साई इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक किल्ले सामानगडला भेट दिली. सामानगडावरील मोगल टेकडी, झेंडा बुरुज, अंधार कोठडी, सात कमान विहीर आदी ठिकाणांना भेट देऊन त्याविषयीची ऐतिहासिक माहिती जाणून घेतली. रामदास स्वामींच्या काळातील हनुमान मंदिरालाही विद्यार्थ्यांनी भेट दिली. प्राचार्या दीपाली कोरडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहलीचे नियोजन केले होते.
--------------
ओंकारमध्ये कर्मवीरांना अभिवादन
गडहिंग्लज : येथील ओंकार कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. या वेळी त्यांनी कर्मवीर पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला. सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शर्मिला घाटगे यांनी स्वागत केले. वाणिज्य विभागप्रमुख डॉ. महेंद्र जाधव, प्रकाश कांबळे, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56461 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top