कोल्हापूरमध्ये वीर सेवा दलातर्फे नवउद्योजकांसाठी कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूरमध्ये वीर सेवा दलातर्फे नवउद्योजकांसाठी कार्यशाळा
कोल्हापूरमध्ये वीर सेवा दलातर्फे नवउद्योजकांसाठी कार्यशाळा

कोल्हापूरमध्ये वीर सेवा दलातर्फे नवउद्योजकांसाठी कार्यशाळा

sakal_logo
By

20583
-------------
उद्योग उभारण्यासाठी संयम, नम्रता सचोटी आवश्यक
अनिल बागणे : कोल्हापूरमध्ये वीर सेवा दलातर्फे नवउद्योजकांसाठी कार्यशाळा
दानोळी, ता. ९ ः उद्योग उभा करायचा असेल तर संयम, नम्रता, सचोटी, प्रामाणिकपणा, निरीक्षण व कष्टातील सातत्य हे गुण आत्मसात करायला हवेत. ह्या गुणांशिवाय उद्योगात यश मिळणे कठीण आहे. जगभरातील यशस्वी उद्योजकांमध्ये या गुणांचा समान धागा आढळतो. त्यामुळे या दिशेने वाटचाल करणाऱ्या तरुणांना यशाचा मार्ग सापडतोच, असे प्रतिपादन शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले. ते कोल्हापूर येथे वीर सेवा दलाच्या प्रांतीय, जिल्हा व तालुका समिती आणि सिबीक बिझनेस इनक्युबेरतर्फे नवउद्योजकांसाठी बिझनेस स्टार्टअप कार्यशाळेत बोलत होते. सेवा दलाचे अध्यक्ष शशिकांत राजोबा, भूपाल गिरमल, सुकुमार पाटील, अभय पाटील, अनिल गडकरी, राकेश चौगुले उपस्थित होते. कार्यशाळेत राज्यभरातून तरुण सहभागी झाले होते.
दीपक पाटील म्हणाले, ‘‘उद्योजक असाच होत नाही. त्याच्यामध्ये तो गुण आवश्यक असायला हवा.’ सूर्यंकांत दोडमिसे यांनी व्यावसाय चालू करण्यासाठी आवश्यक गोष्टींची माहिती दिली. सचिन कुंभोजे यांनी बिझनेस मॉडेल, व्यवसायाचा प्रकार, बाजारपेठेतील गरज व त्यानुसार व्यवसायाची निवड याविषयी मार्गदर्शन केले. स्वागत अजित पाटील यांनी केले. प्रास्ताविक आशिष देसाई यांनी केले. सूत्रसंचालन आशितोष चौगुले यांनी केले. आभार विजय बरगाले यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56479 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top