
बावडा उपनगर
20603
शाहू विद्यामंदिरात संस्कार शिबिर
कसबा बावडा, ता. ९ ः येथील महापालिकेच्या राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा नंबर ११ मध्ये केंद्र मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशासनाधिकरी डी. सी. कुंभार यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोफत शाहू संस्कार व्यक्तिमत्त्व विकास शिबिर झाले.
यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीमधील विद्यार्थ्यांना मोफत शिबिरमध्ये ध्यानधारणा, योगासने, एरोबिक्स, झांज पथक, कवायत, कागद काम, तायक्वाँदो, इंग्रजी प्रभुत्व, प्रभावी वक्तृत्व, नाट्यकरण, सुंदर हस्ताक्षर, संस्कारक्षम बोधकथा, गणितीय गमती जमती, सर्प आपले मित्र आदी विषयावर सकाळी ८ ते ११ यावेळेत विविध मार्गदर्शक तज्ज्ञ प्रदीप पाटील, राजेंद्र पाटील, द्वारकानाथ भोसले, संतोष कसबे, तमेजा मुजावर, सुभाष मराठे, सातप्पा पाटील, स्वाती रेळेकर, अरुण सुनगार, तानाजी इंदुलकर या तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, बाळासाहेब कांबळे, उषा सरदेसाई यांनी विशेष सहकार्य केले.
सदर शिबिरातील विद्यार्थ्यांना शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, दिलीप माने, विलास पिंगळे, संजय पाटील, बजरंग रणदिवे, संजय लाड, भारतवीर मित्र मंडळाचे सचिन चौगले, राहुल भोसले यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांना खाऊ व बिस्किटे दिली. शिबिर यशस्वी होण्यासाठी उत्तम कुंभार, सुशील जाधव, तमेजा मुजावर, शिवशंभू गाटे, जोतिबा बामणे यांनी सहकार्य केले. नियोजन शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉ. पाटील यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56506 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..