घाटगे ग्रुप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाटगे ग्रुप
घाटगे ग्रुप

घाटगे ग्रुप

sakal_logo
By

20608

वसंतराव घाटगे यांना
विविध उपक्रमांतून अभिवादन
...................
घाटगे ग्रुपतर्फे प्रभातफेरी, रक्तदान व मदतीचे धनादेश प्रदान
............
कोल्हापूर, ता. ९ ः घाटगे ग्रुपचे संस्थापक वसंतराव घाटगे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विविध कार्यक्रमातून अभिवादन केले. कै. घाटगे यांचा जन्मदिवस ‘फौंडर्स डे’ म्हणून ओळखला जातो, त्यानिमित्त प्रभातफेरी, रक्तदान शिबिर व खेळाडूंना मदतीचे धनादेश देण्यात आले.
कोल्हापूर शहरात औद्योगिक आणि वाहतुकीच्या क्षेत्रात कामाची सुरुवात करून तसेच हजारो कुटुंबांना रोजगार देऊन घाटगे ग्रुपने स्वतःची ओळख निर्माण केली. घाटगे ग्रुपच्या विविध कंपन्यांच्या माध्यमातून लाखो ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्याची परंपरा आजही जपली आहे. आजच्या आधुनिक काळात कै. वसंतराव घाटगे यांची शिकवण मोलाचे मार्गदर्शन करणारी आहे. त्यांच्या उद्योगविषयक धोरणांवर घाटगे ग्रुपच्या सर्व कंपन्या कार्यरत आहेत.
दरवर्षी घाटगे कुटुंबीय आणि सर्व कंपन्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रभातफेरी निघाली. त्याची सुरूवात ताराबाई पार्कातील वसंतराव घाटगे पथावरील फलकाला पुष्पहार अर्पण केला. घाटगे ग्रुपच्या मुख्यालयात कै. वसंतराव घाटगे यांच्या प्रतिमेचे घाटगे कुटुंबीयांच्या हस्ते पूजन केले.
यावेळी गिर्यारोहक कस्तुरी सावेकर, बॅडमिंटन खेळाडू ऐश्‍वर्या जाधव यांना मदतीचे धनादेश देण्यात आले. या दोघींच्या पालकांनी ही मदत स्वीकारली.
कार्यक्रमात घाटगे ग्रुपचे चेअरमन मोहन घाटगे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्वांनी नवीन तंत्रज्ञान, कार्यपद्धती शिकाव्यात आणि आपल्या दैनंदिन कामकाजात वापरात आणाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी घाटगे ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश घाटगे, नंदिनी घाटगे, साधना घाटगे तसेच माई ह्युंदाईचे संचालक दिग्विजय राजेभोसले व सर्व कंपन्यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आजच्या ‘फौंडर्स डे’ निमित्त घाटगे ग्रुपच्या महाराष्ट्रातील अनेक शाखांत रक्तदान, श्रमदानासारखे अनेक उपक्रम राबवले.
...............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56512 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top