नेसरीत आजरा मार्गावर गटर्स बांधण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेसरीत आजरा मार्गावर गटर्स बांधण्याची मागणी
नेसरीत आजरा मार्गावर गटर्स बांधण्याची मागणी

नेसरीत आजरा मार्गावर गटर्स बांधण्याची मागणी

sakal_logo
By

20606
नेसरी : आजरा फाटा ते दसरा चौकादरम्यान गटार व्यवस्था नसल्याने सांडपाणी असे रस्त्याच्या बाजून वाहते. (छायाचित्र ः दिनकर पाटील)

नेसरीत आजरा मार्गावर
गटार बांधण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नेसरी, ता. ९ : येथील नेसरी-आजरा मार्गावर आजरा फाटा ते दसरा चौक परिसरात दुतर्फा सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटार व्यवस्था नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यात तर पाणी रस्त्यावरूनच वाहते. येथे दुतर्फा गटार बांधण्याची मागणी होत आहे.
येथे आजरा फाटा ते दसरा चौकादरम्यान दोन्ही बाजूंनी अनेक दुकाने, लोकवस्ती आहे. आजरा रस्त्यानजीक नेसरीत तीन हायस्कूल, तीन महाविद्यालये, दसरा चौक आहे. नागरिकांसह विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते. दुतर्फा गटार व्यवस्था नसल्याने सांडपाणी काही ठिकाणी रस्त्यावर, तर काही ठिकाणी जागोजागी साचून दुर्गंधी येते. याचा त्रास नागरिक, दुकानदार व विद्यार्थ्यांना होतो. पावसाळ्यात काही घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले होते. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तत्काळ गटार बांधण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56517 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top