कर्जमाफी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जमाफी
कर्जमाफी

कर्जमाफी

sakal_logo
By

प्रामाणिकपणे कर्ज परतफेड
करणाऱ्यांची माहिती मागवली

जिल्ह्यातील २ लाखांवर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा होणार लाभ

कोल्हापूर, ता. ९ : प्रामाणिक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य शासनाने सर्व माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माहिती देताना २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तिन्ही वर्षांतील प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याची माहिती मागवली आहे. जिल्ह्यातील २ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे, यासाठी तब्बल ३०० ते ४०० कोटींचा निधी प्रस्तावित आहे. बुधवारपर्यंत (ता.११) ही माहिती संकलित करावी लागणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व सेवा संस्थांनी यापूर्वीही ही माहिती संकलित करुन ठेवली आहे.
महापूर, अतिवृष्टीसह इतर कारणांमुळे पीककर्जाची थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. दरम्यान, प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार होते. दरम्यान, दोन वर्षात कोरोनामुळे हा निधी आरोग्यसेवा देण्यासाठी वापरण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात येत होते. तर दुसरीकडे विरोधांकडून शेतकऱ्यांना हा निधी मिळाला नसल्याची टिका होत होती. दरम्यान, सध्या अर्थचक्राला गती मिळाली आहे. महाविकास आघाडी सरकारने दिलेली आश्‍वास पूर्ण करण्यासाठी व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर निधी देण्यासाठी आवश्‍यक सर्व माहिती मागविण्यासाठी सहकार विभागाची यंत्रणा गतीमान केली आहे. याचा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. जिल्ह्यातील २लाखाहून अधिक शेतकरी प्रामाणिपणे कर्ज परतफेड केली आहे. त्यांच्याकडून घेतल्या जात असलेल्या माहिती शासनाच्या अधिकृत पोर्टला जोडून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा केली जाणार आहे.
.....

* ही माहिती अपेक्षीत :
जिल्ह्यातील सुमारे ५ हजारहून अधिक सेवा संस्थांतून सुमारे २ लाखाहून अधिक खातेदारांनी घेतलेल्या कर्जाची माहिती मागवली आहे. तसेच, वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, बॅंक पासबूक लिंक करणे अपेक्षीत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56535 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top