करवीर पीठाचा जयंती उत्सव बुधवारपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करवीर पीठाचा जयंती उत्सव बुधवारपासून
करवीर पीठाचा जयंती उत्सव बुधवारपासून

करवीर पीठाचा जयंती उत्सव बुधवारपासून

sakal_logo
By

शंकराचार्य पीठाचा जयंती उत्सव उद्यापासून
श्री विद्यानृसिंह भारती ः आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः येथील श्री स्वामी जगदगुरू शंकाराचार्य करवीर पीठ येथे बुधवारी (ता.११) पासून आद्य शंकराचार्यांचा दोन हजार 530 वा जयंती उत्सव होणार असल्याची माहिती शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षांनंतर भाविकांच्या अपूर्व उत्साहात हा उत्सव होईल, असेही त्यांनी सांगितले.
बुधवार (ता.११) ते सोमवार (ता. १६) असे आठवडाभर विविध कार्यक्रम होणार आहेत. कीर्तन, प्रवचन, गायन, हवन या कार्यक्रमांबरोबर पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, पालखी प्रदक्षिणा आहे. रविवारी (ता.१५) ‘करवीर पीठाचा इतिहास'' या पुस्तकाचे प्रकाशन, पुरस्कार वितरण होईल. त्यामध्ये वैदिक पुरस्कार गोपाळ जोशी (पुणे), सांस्कृतिक पुरस्कार राजारामशास्त्री शुक्ल (वाराणसी), कीर्तनकार पुरस्कार प्रकाश मुळे (जालना), स्थानिक वैदिक पुरस्कार गुरुप्रसाद विनायक पुजारी (कराड), सामाजिक गौरव पुरस्कार बीव्हीजी ग्रुपचे डॉ. दत्तात्रय गायकवाड (पुणे), महिला कीर्तनकार पुरस्कार कांचन अनिल नाजपांडे (नागपूर) व होतकरू विद्यार्थी पुरस्कार दत्तात्रेय यज्ञेश्वर जोशी यांना प्रदान करण्यात येईल. सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गो. बं. देगलूरकर उपस्थित राहतील.
सोमवारी (ता. १६) महाप्रसादाचे आहे. दुपारी चार वाजता पालखी प्रदक्षिणा होईल. शहराच्या प्रमुख मार्गावरून पालखी करवीर निवासिनी अंबाबाईला जाईल व तेथून परत ती पीठात येईल. तत्पूर्वी पीठामध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते पालखीचे पूजन होईल.
दरम्यान, आठवडाभर संजय व्यास, प्रमोदशास्त्री कुलकर्णी, राजेश्वर शास्त्री, अभिषेक पटवर्धन, अनिरुद्ध जोशी, राजाराम शास्त्री शुक्ल सेवा देतील. भाविकांच्या राहण्याची व्यवस्था केल्याचे सचिव शिवस्वरूप भेंडे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56537 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top