सोमलिंग मंदिराचा कळसारोहन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोमलिंग मंदिराचा कळसारोहन उत्साहात
सोमलिंग मंदिराचा कळसारोहन उत्साहात

सोमलिंग मंदिराचा कळसारोहन उत्साहात

sakal_logo
By

20624
मुगळी : सोमलिंग मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा कार्यक़्रमप्रसंगी श्री शिवलिंगेश्‍वर महास्वामीजी, श्री गुरुसिद्धेश्‍वर महास्वामी, रमेश आरबोळे व जीर्णोद्धार समितीचे सदस्य.

सोमलिंग मंदिराचा कळसारोहन उत्साहात
मूर्ती प्राणप्रतिष्ठापनासह वास्तूशांती सोहळ्यास भाविकांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. ९ : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामदैवत श्री सोमलिंग मंदिराची वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात उत्साहात झाला.
आज सकाळी हिरण्यकेशी नदी घाटावरून मिरवणुकीने सुहासिनींनी डोक्यावर कलश घेऊन गंगा मंदिरात आणली. त्यानंतर श्री सोमलिंग पिंडीवर, नंदी आणि पितळी कळसावर अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर नूल येथील सुरगीश्वर मठाचे मठाधिपती श्री गुरुसिद्धेश्‍वर स्वामीजी व इतर मठाधीशांच्या हस्ते मूर्तीची व नंदीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. श्री सोमलिंग पिंडी, नंदीची मूर्ती आणि कळसावर धार्मिक मंत्रोपचाराने अभिषेक झाला. धार्मिक विधीसाठी रमेश आरबोळे, नितीन पाटील, आप्पासाहेब जाधव, अशोक महाडिक, रायगोंडा पाटील, अ‍ॅड. गजानन पाटील, डॉ. श्रवण आरबोळे, सागर पोवार, डी. पी. पाटील दाम्पत्यांनी धार्मिक विधी पार पाडले. मुरगय्या स्वामी, सिद्धेश्‍वर शास्त्री (कोणकेरी), आनंद शास्त्री व विशाल शास्त्री (शहापुर), रोहन मठपती (मुगळी) यांनी पौरोहित्याचे काम केले. त्यानंतर कळसारोहनाचा कार्यक्रम झाला. निडसोशी मठाचे जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी व गुरुसिद्धेश्‍वर शिवाचार्य स्वामीजींच्या हस्ते कळसाची विधीवत पूजा करून कळस शिखरावर चढविला. श्री सोमलिंगेश्‍वर महाराज की जय आणि ओम नमः शिवायच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात कळसारोहनचा सोहळा झाला. या वेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार राजू शेट्टी, स्वागताध्यक्ष सोमगोंडा आरबोळे, जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष रमेश आरबोळे यांच्यासह सर्व सदस्य व भाविक उपस्थित होते. दरम्यान, चार फूट उंचीचा आणि २६ किलो वजनाचा आकर्षक पितळी कळस खणदाळ येथील शंकर यरकदावर या कारागीराने बनविला आहे. या मुख्य सोहळ्यानंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला. हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56556 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top