
चंदगडच्या विकासाचा नवा लुक देवू ः खासदार मंडलिक
20628
म्हाळेवाडी : येथील सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन करताना खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, सुश्मिता पाटील, नरसू पाटील, सरपंच सी. ए. पाटील व इतर.
चंदगडच्या विकासाचा नवा लुक देवू
खासदार मंडलिक; म्हाळेवाडीत संयुक्त कार्यक्रम
कोवाड, ता. ९ : चंदगड तालुका हा निसर्ग संपन्न आहे. पर्यटनाच्या नकाशावर तो ठळकपणे यावा आणि तालुक्यात रोजगार वाढावा, अर्थकरणाला गती मिळावी, यासाठी आमदार राजेश पाटील यांचे प्रयत्न सुरू असले तरी चंदगडकरानी आम्हाला नेहमी साथ दिल्याने तालुक्याला विकासाचा नवा लुक देण्याचा संकल्प असल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले.
म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे लक्ष्मी मंदिर जिर्णोध्दार, वास्तूशांती व सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमात खासदार मंडलिक बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाटील होते.
नामफलकाचे उद्घाटन सुश्मिता पाटील यांचे हस्ते झाले. सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन खासदार मंडलिक यांच्या हस्ते झाले. सरपंच सी. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच विजय मर्णहोळकर यांनी केले. पी. वाय. पाटील यांनी परिचय करुन दिला.
खासदार मंडलिक म्हणाले, ‘‘चंदगड तालुक्याच्या जनतेचा माझ्या राजकीय वाटचालीत मोठे योगदान आहे. त्यामुळे आमदार राजेश पाटील यांच्या सहकार्याने चंदगडच्या विकासाला गती देण्यासाठी नेहमी प्राधान्य दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या मतदारसंघात जळपास नऊ कोटीच्या विकास कामांचे नियोजन केले आहे. हा तालुका निसर्गसंपन्न असल्याने राज्याच्या पर्यटनावर आणण्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहे. म्हाळेवाडी गावासाठी १५ लाखाचा निधी देणार आहे.’’
आमदार राजेश पाटील म्हणाले, ‘‘स्वर्गीय नरसिंगराव पाटील, बाबा कुपेकर आणि सदाशिवराव मंडलिक यांचे विचार व त्यांची तत्व या मतदार संघात रुजलेले असल्याने येथील जनता नेहमी सत्याच्या बाजूने राहिली आहे. त्यामुळे बाबा कुपेकर,नरसिंगराव पाटील व मंडलिक यांना साथ मिळाली. त्यांच्याच विचाराने वाटचाल करत असल्याने मतदारसंघात तीनशे कोटींवर विकास निधी आणण्यात यश मिळाले. या वेळी नरसू पाटील, सुरेश कुराडे, सुश्मिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अभय देसाई, मुकुंद देसाई, राजेश पाटील, माई सलाम, अनिल सुरुतकर, भिकू गावडे, बंडू चिगरे, तानाजी गडकरी, आर. पी. पाटील, गोपाळ ओऊळकर उपस्थित होते. शिवाजी पाटील यांनी सुत्रसंचालन केले. संभाजी पाटील यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56562 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..