भूपाल शेटे पत्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूपाल शेटे पत्रक
भूपाल शेटे पत्रक

भूपाल शेटे पत्रक

sakal_logo
By

संजय भोसले यांच्यावर
कारवाई कराः भूपाल शेटे

कोल्हापूर, ता. ९ ः कोट्यवधीच्या घरफाळा घोटाळ्यात अडकलेले अंतर्गत लेखापरीक्षक संजय भोसले कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणत आहे. त्यांचा प्रयत्न प्रशासनाने हाणून पाडून कारवाई करावी अशी मागणी माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी निवेदनाद्वारे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी केली. तसेच आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
शेटे यांनी पत्रकात म्हटले आहे, २७ कोटीच्या आर्थिक नुकसानीबाबत ९ कारणे दाखवा नोटीसांना भोसले यांनी दिलेला खुलासा प्रशासनाने अमान्य केला आहे. प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्या पगार, वाहनावर झालेला खर्च वसूल केला जाणार आहे. त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही महापालिकेच्या पाठिशी रहावे. निवेदन देताना भागातील नागरिकही उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56577 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top