नाल्यातील अतिक्रमण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाल्यातील अतिक्रमण
नाल्यातील अतिक्रमण

नाल्यातील अतिक्रमण

sakal_logo
By

20676


नाल्यांलगतची बांधकामे काढा; अन्यथा कारवाई
८० मिळकतधारकांना महापालिकेची नोटीस : संभाव्य पूरस्थितीचा आढावा

कोल्हापूर, ता. ९ : नाल्यांच्या परिसरातील अनाधिकृत बांधकामे करणाऱ्या ८० मिळकतींधारकांना आज महापालिकेच्या नगरचना विभागामार्फत नोटीस दिल्या. तसेच पूरक्षेत्रात येणाऱ्या १०९ इमारतींना विविध सुविधा कार्यान्वित करण्याच्याही नोटीस दिल्या. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन कारवाईच्या सूचना आज सकाळी घेतलेल्या बैठकीत नगररचना विभागाचे सहायक संचालक रामचंद्र महाजन यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे तातडीने ही कारवाई केली.
राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाने ६ डिसेंबर २०१९ रोजी शहरातील पंचगंगा नदीलगत अंतिम निळी, लाल व हिरवी पूररेषा निश्चीत करून नकाशे प्रसिध्द केले आहेत. या अनुषंगाने आज सकाळी महापालिकेत मॉन्सून आणि संभाव्य पूरस्थितीसाठी पूर्वतयारी आढावा बैठक झाली. त्यात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी २०२१ ची पूरस्थिती विचारात घेऊन रहिवास, वाणिज्य प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट, रेस्क्यू बोट, इमर्जन्सी लाईट आदी सुविधा पावसाळ्यापूर्वी कार्यान्वित करण्याचे आदेश दिले.
आढावा बैठकीत नाले सफाईबाबत उपायुक्त, सहायक आयुक्त व उपशहर अभियंता यांना फिरती करून दोन दिवसात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. धोकादायक इमारतींवर कारवाईच्या सूचना उपशहर अभियंत्यांना दिल्या. तसेच पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे, खांब उतरवून घेण्याचे काम उद्यान व विद्युत विभागाला करण्यास सांगितले. रस्ते कामांच्या ज्या निविदा मंजूर झाल्या आहेत. त्यांची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना दिल्या. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी मागील सूचनांवर काय कारवाई केली याची माहिती देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. आरोग्य, पवडी, अग्निशमन, आरोग्य, उद्यान विभागांनी केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी, जल अभियंता हर्षजित घाटगे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रणजीत चिले, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, उपशहर अभियंता नारायण भोसले, एन. एस. पाटील, बाबूराव दबडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत उपस्थित होते.

८८ धोकादायक इमारतींवर कारवाई
विभागीय कार्यालय एक अंतर्गत २ धोकादायक इमारती असून त्यांची कोर्टकेस सुरू आहे. विभागीय कार्यालय दोन अंतर्गत १३० धोकादायक इमारती असून ७९ इमारतींवर कारवाई केली आहे. १३ इमारतींच्या कोर्टकेस सुरू आहेत. ३८ इमारतींवर कारवाई करण्यात येणार आहे. विभागीय कार्यालय तीन अंतर्गत १७ इमारती असून ९ इमारतींवर कारवाई करण्यात आली. ४ इमारती दुरूस्त केल्या आहेत. ४ इमारती उतरविण्यात येणार आहेत. विभागीय कार्यालय चार अंतर्गत २० इमारती असून ५ इमारतींमध्ये रहात नाही. ३ इमारती उतरविल्या आहेत तर १२ इमारती दुरुस्त करण्यात येत आहेत.
.................

चौकट
लाईफ जॅकेट आणि रेस्क्यू बोटचे अपार्टमेंटना बंधन
चारही विभागीय कार्यालयांनी नाल्यांचा सर्व्हे करून बाधीत मिळकतींनी केलेल्या अनाधिकृत बांधकामांना नोटीस दिल्या. भुखंड नियंत्रीत, सतर्कता क्षेत्रात असलेल्या प्रकल्पांना प्रति १० चौरस मीटर बांधकाम क्षेत्राकरीता १ लाईफ जॅकेट,२० हून अधिक सदनिका असणाऱ्या इमारतीस रेस्क्यू बोट, इमर्जन्सी लाईट आदी सुविधा कार्यान्वित कराव्यात. त्याचा अहवाल सादर करण्याबाबत १०९ इमारतींना नोटीस दिल्या. तसेच प्रकल्पातील ट्रान्सफॉर्मर, पाण्याच्या टाकी, सांडपाणी प्रक्रिया केंद्र या सुविधा महत्तम पूररेषा पातळीवर कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. नाला परिसरात केलेली अनाधिकृत बांधकामे स्वत:हून काढून घ्यावीत, असेही आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56590 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top