समरजितसिंह बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समरजितसिंह बातमी
समरजितसिंह बातमी

समरजितसिंह बातमी

sakal_logo
By

तुम्ही सोन्याचा खंजीर घेऊन जन्माला आला
....................
समरजितसिंह घाटगेंचे प्रत्युत्तर ः ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांवर डागली तोफ
.................
कोल्हापूर, ता. ९ ः मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलोय म्हणणारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे राजकारणात सोन्याचा खंजीर घेऊन जन्माला आले आहे, त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली, राजकारणात आणले त्यांच्याच पाठीत त्यांनी हा खंजीर खुपसला आहे, अशा शब्दात आज भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली.
कागल येथील एका कार्यक्रमात श्री. मुश्रीफ यांनी श्री. घाटगे यांच्यावर टीका करताना सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या माणसाला तुम्ही भेटणार कुठे?, त्यांना प्रश्‍न सांगणार कसे ? असे प्रश्‍न उपस्थित केले होते, त्याला श्री. घाटगे यांनी व्हीडीओच्या माध्यमातून प्रत्यूत्तर दिले. स्वर्गीय माजी आमदार शामराव भिवाजी पाटील यांनी तुम्हाला सहकारात आणले, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांना बँकेतून बाहेर काढले. राजे विक्रमसिंह घाटगे यांचे बोट धरून तुम्ही राजकारणात आला, त्यांनी तुम्हाला शाहू कारखान्याचे संचालक केले, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून तुम्ही दुसऱ्या बाजूला गेला, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी स्वतःच्या रक्ताच्या वशंजाला बाजूला ठेवून अल्पसंख्याक व्यक्तीला आमदार, मंत्री केले, अशा मंडलिकांच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसले, त्यांना किती वेदना दिल्या, त्यांच्यावर किती टीका केली, हे मी बोलूही शकत नाही. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलोही असेल पण तुम्ही काय केलेत ते सांगा? असे श्री. घाटगे यांनी व्हीडीओत म्हटले आहे.
स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या जुन्या मतदारसंघातील काही भाग कागलला जोडल्यानंतर मी आहे, समजून श्री. मुश्रीफ यांना मतदान करण्याचे आवाहन केले, पण त्या कुपेकर यांच्याही पाठीत तुम्ही खंजीर खुपसला. कै.कुपेकर यांच्या निधनानंतर श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांना त्या भाजपमध्ये गेल्या तर त्यांना आमदारकी राहाणार नाही, असे वक्तव्य तुम्ही केले होते. ज्या घराण्यामुळे तुम्हाला मतदान मिळाले, त्यांना बोलताना एवढी मग्रुरी कोठून आली. तुमचा खंजीर खुपसायचा इतिहास पाहिला तर ही कलियुगातील मोघलाईच आहे, अशी पदवी तुम्हाला प्रदान केली पाहीजे, असे माझे स्पष्ट मत असल्याचे श्री. घाटगे यांनी म्हटले आहे.
..........

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56593 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top