जयंतीत प्लास्टिक कचरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयंतीत प्लास्टिक कचरा
जयंतीत प्लास्टिक कचरा

जयंतीत प्लास्टिक कचरा

sakal_logo
By

20642

जयंती नाला भरला प्लास्टिक कचऱ्याने
पावसामुळे नदीत वाहून जाण्याची भीती; महापालिकेकडून मोहीम राबविण्याची गरज

कोल्हापूर, ता. ९ ः राज्य शासनाने जाहीर केलेली प्लास्टिक बंदी शहरात बासनात गुंडाळून ठेवल्याचे जयंती नाल्याच्या ठिकाणी पहायला मिळत आहे. नाल्यातून वाहत आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्यांच्या कचऱ्याने जयंती नाला व्यापून गेला आहे. एखादा मोठा पाऊस झाल्यास हा सर्व कचरा वाहून थेट पंचगंगा नदीत मिसळणार आहे. नदी प्रदूषणामध्ये भर घालण्याऐवजी तातडीने हा कचरा उचलला जाण्याची आवश्‍यकता आहे.
सरकारने जाहीर केलेल्या प्लास्टिक बंदीनंतर महापालिकेने कारवाई केली; पण कोरोनानंतर ती कारवाई कमी झाली व विक्रेत्यांकडे बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या जवळपास सर्वत्र उपलब्ध होऊ लागल्या. त्या कचऱ्यातून आल्या तर त्यांचे विलगीकरण करून त्याचा धोका कमी करता येऊ शकत होता; पण शहराच्या विविध भागातून वाहत असलेल्या गटारी, नाल्यांमधून येणारे प्लास्टिक रोखण्यासाठी काहीच उपाययोजना नाही. जयंती नाल्यावर हा कचरा आल्यानंतर महापालिका त्याचा उठाव करत होती. त्यासाठी जयंती नाल्यावर कर्मचारी नेमले होते. सध्या तो कचरा काढला गेला नसल्याने नाला प्लास्टिकच्या कचऱ्याने भरला आहे.
सध्या वळीव पावसाची शक्यता आहे. पाऊस झाल्यास नाला ओसंडून वाहून कचरा थेट पंचगंगा नदीत जाणार आहे. नदी प्रदूषण रोखण्याबाबत सर्व पातळीवर प्रयत्न केले जात असताना या प्रकारामुळे साऱ्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाणार आहे. महापालिकेने हा कचरा तातडीने उचलल्यास त्यातून होणारे नदी प्रदूषण रोखले जाऊ शकते.

चौकट
राजारामपुरी चौकानजीक कायम ढिग
राजारामपुरी पोलिस चौकीसमोर असलेल्या नाल्यात दररोज प्लास्टिकच्या बाटल्या तसेच पिशव्या मोठ्या प्रमाणावर साचलेल्या दिसतात. त्याचवेळी जर हा कचरा उठवला तर नाल्यात येणाऱ्या या कचऱ्याचेप प्रमाण थोडे कमी होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56598 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top