बाजार कर वसुली मक्तेदाराकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार कर वसुली मक्तेदाराकडे
बाजार कर वसुली मक्तेदाराकडे

बाजार कर वसुली मक्तेदाराकडे

sakal_logo
By

बाजार कर वसुली मक्तेदाराकडे
ई- लिलाव प्रक्रियेला सुरुवात : बोलीची मूळ रक्कम १ कोटी ८० हजार

इचलकरंजी, ता. ९ ः येथील पालिकेने पुन्हा एकदा बाजार कर वसुलीचे काम मक्तेदाराकडे दिले आहे. याबाबतची ई-लिलाव प्रक्रिया नुकतीच जाहीर केली आहे. एक वर्षाच्या मुदतीने हा मक्ता देण्यात येणार आहे. मूळ बोलीची रक्कम १ कोटी ८० हजार निश्‍चित केली आहे. ६ जूनला सांयकाळी पाच वाजेपर्यंत ई - लिलावमध्ये सहभाग घेण्याची मुदत आहे. मात्र पूर्वानूभव पाहता पालिकेचा हा प्रयत्न यशस्वी होणार काय, याकडे लक्ष लागले आहे.
शहरातील आठवडा बाजारासह विविध ठिकाणी बसणाऱ्या भाजीपाला व किरकोळ वस्तू विक्रेत्यांकडून भुई भाडे म्हणून पालिकेकडून बाजार कराची वसुली केली जाते. यासाठी पालिकेचे दहा कर्मचारी नियुक्त केले आहेत. याशिवाय दिवाळीसह अन्य सणावेळी विविध साहित्याचे स्टॉल लावण्यात येतात. त्यांच्याकडूनही हा कर वसुल केला जातो. वर्षभरात सरासरी ६५ लाखांचे उत्पन्न पालिकेला यातून मिळते. पण दोन वर्षे कोरोनामुळे बाजार कर वसुलीवर परिणाम झाला. आता उत्पन्न वाढवण्याच्यादृष्टीने पालिकेने बाजार कर वसुलीचे काम पुन्हा मक्तेदाराकडे सोपवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
यापूर्वीही अनेकवेळा मक्तेदाराकंडे बाजार वसुलीचे काम पालिकेकडून दिले होते. मात्र विक्रेत्यांकडून विरोध झाल्यानंतर पुन्हा हे काम पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यामध्ये राजकीय हस्तक्षेप प्रभावी ठरला होता. तथापि, मक्तेदाराच्या माध्यमातून हे काम केल्यास पालिकेला दुप्पट उत्पन्न मिळणार आहे. तसेच मनुष्यबळही अन्य कामांसाठी उपलब्ध होणार आहे. या कामाची मूळ बोलीची रक्कम १ कोटी ८० हजार आहे. त्यावर पुढे बोली बोलली जाणार आहे. याबाबतची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. ई - लिलाव बोलीची मुदत ६ जूनपर्यंत आहे. पालिकेने धाडसाने हा निर्णय घेतला असला तरी याबाबतचे कोणते पडसाद उमटणार याकडे लक्ष लागले आहे.
------------
बाजार कर वसुली दृष्‍टिक्षेप
२०१८-१९ * ६७ लाख २४ हजार
२०१९-२० * ५३ लाख ८ हजार
२०२०-२१ * ३३ लाख ३ हजार
२०२१-२२ * ३९ लाख ४० हजार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56608 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top