राजाराम बंधारा पर्यायी पुल-राजेश क्षीरसागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजाराम बंधारा पर्यायी पुल-राजेश क्षीरसागर
राजाराम बंधारा पर्यायी पुल-राजेश क्षीरसागर

राजाराम बंधारा पर्यायी पुल-राजेश क्षीरसागर

sakal_logo
By

20655

राजाराम बंधाऱ्यावरील पर्यायी
पुलाचे काम तातडीने पूर्ण करा

राजेश क्षीरसागर; जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

कोल्हापूर, ता. ९ ः राजाराम बंधाऱ्यावरील पर्यायी पुलाचे बांधकाम तातडीने सुरू करण्यासाठी आवश्‍यक भूसंपादन करावे, तसेच संभाव्य पूरस्थिती नियंत्रणात राहील, असे नियोजन करण्याच्या सूचना आज राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ऑक्टोबरपर्यंत भूसंपादनाचा प्रश्‍न मार्गी लागेल, त्यासाठी विशेष अधिकारी नियुक्त केल्याची माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
दर वर्षीच्या पूरस्थितीत शहराला जोडणारा राजाराम बंधारा हा रस्ता पाण्याखाली जातो. त्यामुळे आसपासच्या २० ते २५ गावांचा संपर्क तुटला जातो. रस्ता बंद झाल्याने पूरस्थितीत सुमारे दोन महिने तो वाहतुकीस बंद होत असल्याने हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. नाबार्डच्या माध्यमातून २०१७ मध्ये १७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला; पण त्याचेही काम थांबले आहे. नवीन पुलावरून पाणी जात असल्यास त्याची उंची वाढवण्याची आवश्यकता आहे का, याची पडताळणी करावी. ५ वर्षांत काम पूर्ण होत नाही याची जबाबदारी कोणाची, काम थांबल्याची कारणे काय, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की, २०१९ व २०२१ मधील पूरस्थिती अनपेक्षित होती. त्यामुळे नवीन पुलावरही पुराचे पाणी होते. नवीन पर्यायी पुलाच्या कामात दोन नागरिकांनी जमीन हस्तांतरित करण्यास विरोध केल्याने काम थांबले होते. या भूसंपादनाविषयी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करून जमीनधारकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे सव्वाचार पट दराने जमिनीचे मूल्यांकनही केले आहे. पूरग्रस्त गावातील नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तत्काळ मार्ग काढावा, अशा सूचना देण्यात आल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, उपअभियंता महेश कांझेर, शाखा अभियंता पी. एल. नांदिवले उपस्थित होते.

चौकट
महापौर शिवसेनेचा असेल
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेची सत्ता येईल. कोणत्याही परिस्थितीत महापौर शिवसेनेचा असेल, असा विश्‍वास व्यक्त केला. शिवसेनेचे कार्यकर्ते यासाठी गतीने कामाला लागले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56626 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top