पाणीपुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणीपुरवठा
पाणीपुरवठा

पाणीपुरवठा

sakal_logo
By

टॅंकरच्या २४ फेऱ्यांद्वारे
निम्म्या शहरात पाणीपुरवठा

कोल्हापूर, ता. ९ ः बालिंगा जल उपसा केंद्राकडील वीजपुरवठा आज दिवसभर बंद राहिल्याने ए, बी, सी, डी वॉर्ड तसेच संलग्न उपनगरांमध्ये पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे दिवसभरात ८ टॅंकरच्या २४ फेऱ्यांद्वारे विविध भागांत पाणीपुरवठा करण्यात आला. उद्या (ता. १०) काही भागांत अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
महापारेषणकडून तांत्रिक कामासाठी सोमवारी दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवल्याने बालिंगा उपसा केंद्र बंद राहिले. त्यामुळे पाणी उपसा करता आला नाही. परिणामी या केंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागात दिवसभरात पाणीपुरवठा झाला नाही. दुपारी चार वाजता पुन्हा उपसा सुरू झाला. तोपर्यंत आठ टॅंकरनी कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रावरून ११, तर कळंबा फिल्टर हाऊसवरून १३ फेऱ्यांद्वारे नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले.
उपसा केंद्र बंद असल्याने पाणीपुरवठा विभागाने अन्य कामे पूर्ण करून घेतली. त्यामध्ये जावळाचा गणपती व पुईखडी येथील व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम करण्यात आले. ना. पा. हायस्कूलजवळ व्हॉल्व्हची गळती होती. तसेच जॅकवेलजवळील पाईपलाईनच्या तोंडावर जमा झालेला कचराही काढण्यात आला. कचरा काढल्याने पाण्याचा उपसा वाढला असून, लवकर टाकी भरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मंगळवारी अपवाद वगळता सर्वत्र पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56638 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top