फुटबॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटबॉल
फुटबॉल

फुटबॉल

sakal_logo
By

२०६५६

शिवाजी तरुण मंडळाचा एकतर्फी विजय
सतेज चषक फुटबॉल स्पर्धा; ‘दिलबहार तालीम’वर मात
कोल्हापूर, ता. ९ : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या साखळी सामन्यात शिवाजी तरुण मंडळने दिलबहार तालीम मंडळवर २ - ० ने एकतर्फी मात केली. शिवाजी मंडळ विरुद्ध दिलबहार यांच्यातील सामना एकतर्फी झाला. सातत्याने आक्रमक खेळ करणाऱ्या शिवाजी मंडळने पहिला विजय मिळवत ३ गुणांची कमाई केली. सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. शिवाजी मंडळच्या अनेक चाली रोखण्यात दिलबहार ची मधली फळी यशस्वी ठरली. तर आघाडीच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत मंडळच्या खेळाडूंवर दबाव आणला. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल साधता न आल्याने सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात मंडळ संघाने आक्रमक सुरुवात करत सामना सुरू झाल्या झाल्या ४५ व्या मिनिटाला गोल नोंदवला. दिलबहारच्या खेळाडूने चुकीच्या पद्धतीने अडवल्याबद्दल मंडळला पेनल्टी बहाल करण्यात आली. ही संधी साधत विक्रम शिंदे याने गोल नोंदवत संघाला १ - ० अशी आघाडी मिळवून दिली.     
यानंतर दिलबहार ने अधिक आक्रमकता दाखवत मंडळच्या खेळाडूंवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मिळालेल्या संधीचा फायदा त्यांना घेता आला नाही. दरम्यान, सामन्याच्या ६० व्या मिनिटाला संकेत साळोखे याने गोल नोंदवत संघाची आघाडी २ - ० अशी केली. अखेरपर्यंत हा गोलफरक कायम राहत मंडळने सामना जिंकला. लढवय्या खेळाडू म्हणून दिलबहारच्या जावेद जमादार याला गौरवण्यात आले.

चौकट 
खेळाडूवर पुढील
सामन्याची बंदी
चुकीचा खेळ केल्याबद्दल दिलबहारच्या रोहन आडनाईक याला दोन यलो कार्ड होऊन रेड कार्ड देण्यात आले. यामुळे पुढील सामन्याची बंदी घालण्यात आली. 

आजचा सामना 
खंडोबा विरुद्ध फुलेवाडी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56640 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top