पाणी योजना भ्रष्‍टाचारावरुन मुंगूरवाडी ग्रामस्‍थ आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी योजना भ्रष्‍टाचारावरुन मुंगूरवाडी ग्रामस्‍थ आक्रमक
पाणी योजना भ्रष्‍टाचारावरुन मुंगूरवाडी ग्रामस्‍थ आक्रमक

पाणी योजना भ्रष्‍टाचारावरुन मुंगूरवाडी ग्रामस्‍थ आक्रमक

sakal_logo
By

20700


पाणी योजना भ्रष्‍टाचारावरुन
मुंगूरवाडी ग्रामस्‍थ आक्रमक

जिल्‍हा परिषद आवारात उपोषण; पाणी पुरवठा विभागाकडून कारवाईची ग्‍वाही
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ९ : मुंगूरवाडी (ता.गडहिंग्‍लज) येथील राष्‍ट्रीय पेयजल योजनेत भ्रष्‍टाचार झाला आहे. सरपंचासह इतरांना दोषी धरुन त्यांच्यावर कारवाई करावी,
या मागणीसाठी आज मुंगूरवाडीच्या ग्रामस्‍थांनी जिल्‍हा परिषदेच्या आवारात धरणे आंदोलन केले. भ्रष्‍टाचाऱ्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध करत कारवाईची मागणी लावून धरली. अखेर ग्रामस्‍थांच्या मागण्या विचारात घेवून सरपंचांसह तत्‍कालिन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे पत्र मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले.
मुंगूरवाडीत राष्‍ट्रीय पेयजल योजना २०११,१२ ला मंजूर झाली मात्र या योजनेत भ्रष्‍टाचार झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. योजना अजूनही अपूर्ण आहे.
गावास नरेवाडी जॅकवेलमधून पाणी मिळत नाही. पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता समितीचे अध्यक्ष तसेच सचिव, ग्रामसेवक आणि ही योजना राबवताना तत्‍कालिन अधिकारी अपूर्ण योजनेस जबाबदार आहेत. वेळोवेळी तक्रारी देवूनही दखल घेतली नाही. उलट भ्रष्‍टाचाऱ्यांना पाठिशी घालण्याचे काम प्रशासनाने केल्याचे सांगत ग्रामस्‍थांनी जोरदार घोषणाबाजी केली. ग्रामस्‍थ आक्रमक होत असल्याने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्‍थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्‍हाण यांच्यासोबत बैठक घेण्याची मागणी केली. त्यानुसार ही बैठक घेतली. शिष्‍टमंडळाच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सरपंचांवर ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३९ नुसार कारवाई प्रस्‍तावित करणे, तत्‍कालिन अधिकाऱ्यांवर शिस्‍तभंगाची कारवाई प्रस्‍तावित करणे, जल जीवनमधून गावच्या पाणी योजनेचा सविस्‍तर प्रकल्‍प अहवाल तयार करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांनी दिले. यानंतर आंदोलन मागे घेतले. बैठकीस हेमंत कोलेकर यांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला.
दत्तात्रय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आप्पासाहेब पाटील,बाबूराव पाटील, शिवाजी पाटील, भास्कर पाटील, कऱ्याप्पा कुराडे, मनोहर तेरणे, तुकाराम होडगे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56644 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top