धामणी प्रकल्प मार्गी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामणी प्रकल्प मार्गी
धामणी प्रकल्प मार्गी

धामणी प्रकल्प मार्गी

sakal_logo
By

20706

धामणी प्रकल्पाचा मार्ग मोकळा

ठेकेदाराने भरली अनामत रक्कम ; उपोषण मागे, तरुणांच्या एकजुटीचे यश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.९ ः धामणी प्रकल्प परिसरातील सुमारे १०० तरुणांनी आज पाटबंधारे कार्यालयाच्या दारात बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार केल्यावर ठेकेदाराने अनामत रक्कम भरून असणारा प्रश्‍न दूर केला. ठेकेदाराने अनामत रक्कम भरली आहे, करार व कागदोपत्री प्रक्रीया पूर्ण करून आठ दिवसात वर्कऑर्डर काढू, उपोषण स्थागित करा, असे लेखी देऊन आवाहन असे पाटबंधारे विभागाच्या धामणी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील यांनी उपोषण कार्यकर्त्यांना केले. त्यानंतर जनसंघर्ष समितीने उपोषण मागे घेतले आहे. यामुळे धामणी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला. तरुणांच्या एकजुटीला यश आले आहे.
धामणी प्रकल्प २५ वर्षे प्रलंबित आहे, प्रकल्पाचे ८० टक्के काम झाले असून २० टक्के काम बाकी आहे. ५० गावांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत.
धामणी प्रकल्पासाठी आजवर अनेक आंदोलने झाली, मोर्चे निघाले.चर्चा, बैठका झाल्या पण भागातील लोकांच्या वाट्याला नेहमीच निराशाच आल्या. प्रकल्पग्रस्तांनी मे २०१९ मध्ये येणाऱ्या सर्व निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला. तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सहा महिन्यात काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते, आजही काम सुरु झालेले नाही. अखेर ७ एप्रिल २०२२ ला धामणी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पाटील यांना शिष्टमंडळाने भेटून आमच्या व्यथा मांडल्या. त्यांनी प्रकल्पासाठीचा १०० कोटी निधी शिल्लक असून ८० कोटी नवीन मंजूर असल्याचे सांगून महिन्याभारत वर्कऑर्डर निघून काम चालू होईल,
असे आश्वासन दिले होते. मात्र तेही पूर्ण न झाल्यामुळे उपोषणाचा निर्णय घेतला. डॉ.अजित पाटील, राजू पात्रे, विजय पाटील, मनोज देसाई, शाहूराज काटे, तेजस भुतलं, अनिल भुतल, मारुती भुतल, रामदास चौगले, सुरेश पाटील सचिन पाटील यांच्यासह तरुणांचा सहभाग होता.

--
प्रकल्प पूर्ण करण्यासाठी
एकत्र येण्याचे आवाहन
येथे आजी- माजी लोकप्रतिनिधी, जुन्या नव्या समित्या व धामणी प्रकल्पासाठी संघर्ष करणारे सर्व व्यक्तीनीं प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन येथे धामणी प्रकल्प जनसंघर्ष समितीने केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56646 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top