विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घ्या ः एन.एस.यु आय ची मागणी. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घ्या ः एन.एस.यु आय ची मागणी.
विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घ्या ः एन.एस.यु आय ची मागणी.

विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घ्या ः एन.एस.यु आय ची मागणी.

sakal_logo
By

२०७०४

विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घ्या
‘एनएसयूआय''ची मागणी, विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.९ः शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा ऑनलाईन घ्या, अशी मागणी नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया यांनी केली. मागणीसाठी त्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील यांना दिले. ‘एनएसयुआय''चे विद्यार्थी कार्यकर्ते सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र आले. त्यांनी परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात, यासाठी घोषणा दिल्या.
निवेदनात म्हटले आहे, विद्यार्थी अजूनही कोव्हीडमधून सावरलेलेल नाहीत. बऱ्याच विद्यार्त्यांच्या घरातील व्यक्ती कोरोनाच्या बळी पडल्या आहेत. कोव्हीडमुळे नोकरी गेलेल्यांची संख्याही मोठी असून बहुतांशी घरांचे आर्थिक गणिते बिघडली आहेत. त पालकांना विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये किंवा भाड्याने खोली घेऊन शहरात ठेवणे परवडणारे नाही. ऑफलाईन अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा झाल्यास चार महिने शिकवावे लागेल. ऑफलाईन परीक्षा घेतल्याने विद्यापीठाचे पुढील शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होईल. याचा विचार करून ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे. निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुजय चव्हाण, जिल्हाध्यक्ष पार्थ मुंडे, रवी नलवडे, सुजित प्रभावळे, अभिजीत भोसले, श्रेया मोहिते, रोहित उलपे, उमेश पाडळकर, आदित्य कांबळे यांचा समावेश होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56666 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top