रवळनाथ सेवा संस्थामध्ये ‘रवळनाथ विकास’ची सत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रवळनाथ सेवा संस्थामध्ये ‘रवळनाथ विकास’ची सत्ता
रवळनाथ सेवा संस्थामध्ये ‘रवळनाथ विकास’ची सत्ता

रवळनाथ सेवा संस्थामध्ये ‘रवळनाथ विकास’ची सत्ता

sakal_logo
By

रवळनाथ विकास आघाडीला
देऊळवाडीतील संस्थेत सत्ता
आजरा, ता. ९ ः देऊळवाडी (ता. आजरा) येथील रवळनाथ विकास सेवा संस्था मर्यादीत देऊळवाडी-सातेवाडी संस्थेची पंचवार्षिक निवडणुक चुरशीने झाली. यामध्ये रवळनाथ विकास आघाडीने १३ पैकी १२ जागा जिंकून विजय मिळवला. विरोधी रवळनाथ शेतकरी विकास आघाडीला केवळ एक जागेवर समाधान मानावे लागले. या आघाडीचे सागर बंडु कदम हे एकमेव उमेदवार निवडून आले. संस्थेचे २८० सभासद मतदार आहेत. यापैकी २७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून थैल यांनी काम पाहिले. रवळनाथ विकास आघाडीचे विजयी उमेदवार असे; शंकर बाबू पोतनीस, युवराज शामराव पोवार, राजाराम पांडुरंग पोतनीस, बंडू तुकाराम सावंत, विठोबा तुकाराम पोतनीस, उतम नारायण शेटगे, शिवाजी विठोबा पाटील, रत्नाबाई ज्ञानदेव पोतनीस, सरस्वती गणपती पोतनीस, अर्जुन जानबा कांबळे, गुणबाई सदाशिव कानोलकर, बाबू विठु गावडे. रवळनाथ विकास आघाडीचे नेतृत्व संस्थापक राजाराम पोतनीस, युवराज पोवार व शंकर पोतनीस यांनी केले. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीचे नेतृत्व सुरेश सावंत, शांताराम सावंत, आप्पा मरगळे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56672 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top