भारतीय मजूर महागाई निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय मजूर महागाई निदर्शने
भारतीय मजूर महागाई निदर्शने

भारतीय मजूर महागाई निदर्शने

sakal_logo
By

भारतीय मजूर संघाची निदर्शने

कोल्हापूर ः महागाई विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय मजूर संघाने निदर्शने केली. मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दिले. राज्यातील वाढती महागाईबाबत प्रदेश कार्यकारीणीच्या नाशिक येथील बैठकीत चर्चा झाली. यात आज राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार आज येथे निदर्शने केली.
राज्यात गेल्या सात-आठ महिन्यात जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये वाढ होत आहे. खाद्य तेलाच्या किमतीत ४० टक्के तर पेट्रोलीयम पदार्थांच्या किंमतीत ३० टक्के वाढ झाली आहे. कामगारांच्या अन्नधान्य व जीवनावश्‍यक वस्तूवरील किंमती वाढल्यामुळे खर्च एकूण पगाराच्या पन्नास टक्क्यांपर्यंत असतो तो वाढून ७० टक्क्यांपर्यंत पोचला आहे. त्यामुळे महागाईवर आळा घालण्यासाठी तातडीने प्रयत्न करा, पेट्रोलीयम पदार्थांच्या किंमती जीएसटी कक्षेत आणाव्यात. खासगी वाहतुकीच्या प्रवास भाड्यावर निर्बंध आणावेत, खाद्यतेल, डाळी, भाजीपाला आणि अन्नधान्य यांच्या किमतीवर नियंत्रण ठेवावे, यामागणीसाठी निदर्शने करण्यात आली. एस.एन. पाटील, शिवाजी चौगुले, प्रवीण जाधव, तानाजी हातकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निदर्शनात सहभाग घेतल्याची माहिती संघाने दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56681 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top