आजरा ः आजरा कारखाना चोरी बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः आजरा कारखाना चोरी बातमी
आजरा ः आजरा कारखाना चोरी बातमी

आजरा ः आजरा कारखाना चोरी बातमी

sakal_logo
By

बेरिंग चोरी प्रकरणाबाबतचा
चौकशी अहवाल सादर
आजरा कारखान्यातील ३४ कर्मचाऱ्यांवर ठपका
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ९ ः आजरा साखर कारखान्याच्या बेरिंग चोरी प्रकरणाचा अहवाल आज चौकशी समितीने संचालक मंडळाच्या बैठकीत सादर केला. कारखान्याचे सुरक्षा अधिकारी, वॉचमनसह ३४ जणांवर समितीने हलगर्जी, निष्काळजी व बेजबाबदारपणाचा ठपका ठेवला आहे. संबंधितावर प्रशासकीय कारवाई करून आर्थिक भरपाई करून घ्यावी असे अहवालत म्हटले आहे. त्यामुळे ते सर्वजण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कामगार न्यायालयाकडे काम करणाऱ्या वकिलांच्या मार्फत ३४ जणांची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे. तत्पूर्वी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्याचे आदेश संचालक मंडळाने कार्यकारी संचालकांना दिले आहेत असे कारखाना प्रशासनाने सांगितले.
गवसे (ता. आजरा) येथील कारखाना कार्यस्थळावर संचालक मंडळाची बैठक झाली. या वेळी कारखाना चोरीसह अन्य विषय अजेंड्यावर होते. कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे अध्यक्षस्थानी होते. या वेळी चौकशी समितीने बेरिंग चोरी प्रकरणाचा अहवाल सादर केला. ज्‍येष्ठ संचालक अशोक चराटी यांनी ज्यांच्या या चोरी प्रकरणी संशय येतोय ती नावे जाहीर करा, अशी मागणी करून तातडीने कारवाई करावी असा आग्रह धरला. या समितीने स्कॅप विक्रीतून ही चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला असून यावेळी उपस्थित असलेल्या ३४ जणाकडे बोट दाखवले आहे. यामध्ये दोन सुरक्षा अधिकारी, २४ वॉचमन, ३ जमादार , स्टोअर विभागाचा क्लार्क, प्रशासन प्रमुख अधिकारी, अकौटंट यांना जबाबदार धरले आहे. त्यामुळे संबंधितांची वैयक्तिक चौकशी होणार आहे. कारखाना बंद कालावधीत विक्रीसाठी स्कॅप ठेवले होते. साखर सहसंचालकांच्या उपस्थित बैठक घेऊन ऑनलाईन निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार हे स्‍क्रॅपचे साहित्य एकत्र गोळा करून कारखान्याच्या इमारतीत ठेवले होते. त्या स्‍क्रॅपच्या बाजूलाच बेरिंग दुरुस्तीसाटी ठेवल्याचे अहवालत नमूद केले आहे. त्या वेळी स्कॅपमधून सदर बेरिंग्जची चोरीला गेल्याचा संशय चौकशी समितीने व्यक्त केला आहे. संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीत संचालकांच्यात शाब्दिक चकमकीही झाल्या. पण या वादावर पडदा टाकत सदरचे प्रकरणी कामगार न्यायालयाचे मार्गदर्शन मागून संबंधिताची वैयक्तिक चौकशी केली जाणार असून दोषी आढळणाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याबाबत सांगण्यात आले.
३० एप्रिलला संचालक मंडळाच्या बैठकीत अहवाल सादर केला जाणार होता. तो सादर न झाल्याने संचालक अशोक चराटी यांनी नाराजी व्यक्त केली होती. बैठक अर्धवट सोडून ते निघून गेले होते. कारखाना दोन वर्ष बंद होता. गतवर्षी २०२१ मध्ये कारखान्याने जिल्हा बॅंकेच्या ताब्यातून सोडवून घेतल्यावर सदरची चोरी उघड झाली होती. आजरा कारखाना व्यवस्थापन मंडळाने याबाबत २०२१ च्या ऑगस्ट महिन्यात आजरा पोलिसात चोरीची फिर्याद दिली होती. त्याबाबतचा तपास अजून सुरू आहे. दरम्यान, आज चौकशी समितीने अहवाल दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे.
* कोट-
संबंधित प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी आग्रही आहे. या प्रकरणात चार पाच जणावर संशयाची सुई आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून याबाबतची तातडीने चौकशी करून दोषींना शोधावे असे याबाबत पोलीसांकडे पाठपुरावा सुरू आहे. यासाठी सहायक पोलिस निरीक्षकांशी आठवडा भरापूर्वी भेट घेतली होती. चौकशी समितीने अहवालात ३४ जणांवर बोट ठेवले आहे. त्यांची वैयक्तीक चौकशी होणार आहे. जे कोणी यामध्ये दोषी ठरतील त्यांच्यावर व्यवस्थापन कडक कारवाई करेल.
प्रा. सुनील शिंत्रे, अध्यक्ष-आजरा साखर कारखाना

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56686 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top