प्रारुप उद्यापासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रारुप उद्यापासून
प्रारुप उद्यापासून

प्रारुप उद्यापासून

sakal_logo
By

प्रभाग रचनेवर आजपासून
हरकती, सूचना स्विकारणार
--------------------
नगरपालिकांसाठी निवडणूक ; २३ मेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः जिल्ह्यातील ९ नगरपालिकांच्या प्रारुप प्रभाग रचनेवर मंगळवारपासून (ता.१०) चार दिवस हरकती आणि सूचना मुख्याधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे स्विकारल्या जाणार आहेत. ६ जूनला प्रभाग रचना अंतिम केली जाणार आहे. येणाऱ्या हरकती आणि सूचनांवर २३ मेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होईल. त्यानंतर ३० ला सुनावणी व सूचनांवर अभिप्राय देऊन त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयुक्तांना सादर केला जाणार आहे.

मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ९ नगरपालिकांसाठी २२ फेब्रुवारी पासून प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू केली होती.
दरम्यान ११ मार्चला राज्य शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी, अधिनियमात सुधारणा करत प्रभाग रचनेचे अधिकार आपल्याकडे घेतले आहेत. त्यामुळे आयोगाकडून सुरू असलेल्या या प्रभाग रचनेचे काम स्थगित केले होते. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निवडणूका घेण्याबाबतचे आदेश दिले.
यामुळे राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेची १० मार्चपासून स्थगित प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले.
इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, वडगाव या नगरपालिकांत यापूर्वीच प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द केली आहे. --
ओबीसी वगळून प्रभाग रचना
दरम्यान इचलकरंजी नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होत असले तरीही राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेच्या यादीत ‘अ’ वर्ग नगरपालिका म्हणून इचलकरंजी नगरपालिकेचा समावेश केला आहे. त्याचीही प्रभाग रचना होणार अहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने आयोगाने जुनीच प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे ओबीसी वगळून प्रभाग रचना होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56696 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top