वातावरण बदल बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वातावरण बदल बातमी
वातावरण बदल बातमी

वातावरण बदल बातमी

sakal_logo
By

जिल्ह्यात ढगाळ
वातावरण; उकाडा कायम

कोल्हापूर, ता. ९ : शहरासह जिल्ह्यात काल सकाळपासून तापमान कमी जाणवू लागले. आजही नेमकी अशीच स्थिती राहील. दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. कधीही पाऊस पडेल, अशी स्थिती होती; मात्र आज पाऊस झाला नाही. तापमान मात्र दिवसभर ३६ अंशापर्यंत तर संध्याकाळी मात्र हेच तापमान २३ अंशापर्यंत घसरले. आकाशात ढगाचे आच्छादन ४२ टक्के राहिले. परिणामी, तीव्र उन नसले तरी आर्द्रता ७२ टक्के झाल्यामुळे उकाडा जाणवत होता.
काल (ता. ८) दुपारनंतर हलकी पावसाची सर येऊन गेली होती. आज मात्र अशी स्थिती निर्माण होऊनही वळवाची निर्मिती झाली नाही. अजून दोन ते तीन दिवस तापमान जास्त राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने नोंदविला आहे. १५ तारखेनंतर हळूहळू वातावरण बदलून तापमान ही कमी होत जाईल, असा अंदाज व्यक्त झालेला आहे. विशेषत: काही दिवस तीव्र उन जाणवत होते. त्यामुळे लोक दुपारी उन्हाबाहेर पडत नव्हते.
दिवसभर कडक उन अन्‌ सकाळी पहाटे दव असेही वातावरण झाले असून सकाळी नऊ नंतर हे पडलेले दव विरुन जाते. कोल्हापूर जिल्ह्याचे हेच वैशिष्ठ्य आहे, की सायंकाळी चारनंतर पश्‍चिम घाट परिसरातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे दिवसभराची उन्हाची तीव्रता नैसर्गिकररित्या कमी होऊ लागते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56698 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top