सोने चोरीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोने चोरीस
सोने चोरीस

सोने चोरीस

sakal_logo
By

सराफी दुकानातून ४० तोळ्यांचे दागिने चोरीस
टाकाळा येथील घटना, सीसीटीव्ही फुटेज गायब.
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः टाकाळा परिसरातील राणजित एन्टरप्रायजेस या सराफी दुकानातून लॉकरमधील ४० तोळे सोन्यांचे दागिने चोरट्याने पळविले. रविवारी (ता. ८) रात्री ही घटना घडली. चोरट्याने बनावट किल्ल्यांनी दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला. तसेच दुकानातील सीसीटीव्ही आणि त्याचा डीसीआरही पळविला. या घटनेची नोंद सोमवारी संध्याकाळी शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. रणजित शांतिलाल पारेख (वय ४५, रा. सरलष्कर भवन, जोतिबा रोड) यांनी या चोरीची फिर्याद दिली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकाळा येथील माऊली विहार या इमारतीत रणजित यांचे सराफी दुकान आहे. पहिल्या मजल्यावर शोरूम आणि दुसऱ्या मजल्यावर ऑफिस आहे. रविवारी (ता. ८) रात्री १० च्या सुमारास‌ त्यांनी दुकान कुलूप लावून बंद केले. सोमवारी (ता. ९) सकाळी त्यांचा पुतण्या नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी गेला.
यावेळी त्याला शोरूमच्या शटरचे कुलूप उघडलेले दिसले. त्याने आत जाऊन पाहिले असता शोरूममधील सीसीटीव्ही आणि‌ डीसीआर गायब असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तातडीने रणजित पारेख यांना घटनास्थळी बोलावले. त्यांनी दुसऱ्या‌ मजल्यावरील आपल्या ऑफिसकडे धाव घेतली. मात्र, ऑफिस दरवाजाही उघडा होता. आतील काचेचा दरवाजा फोडून‌ चोरट्याने लॉकर उघडला होता. चोरट्याने शोरूम आणि दुकानातील असे मिळून सुमारे ४० तोळ्यांचे दागिने पळविले. तसेच दुकानातील सीसीटीव्ही आणि डीसीआरही चोरट्याने पळविला आहे. त्यामुळे व्हीडिओ फुटेज पाहून चोरट्याला पकडण्यात पोलिसांनी अडचण येत आहे. या परिसरातील अन्य हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून पोलिस फुटेज संकलीत‌ करत आहेत. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस उपाधीक्षक मंगेश जाधव, पोलिस निरीक्षक राजेश‌ गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेशचे पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले हे उपस्थित होते.
-----------------------------
चोरटा माहितीतील
चोरट्याने सात बनावट किल्ल्यांच्या आधारे दुकानात प्रवेश केला. दुकानातील सीसीटीव्ही, डीसीआर चोरट्याने पळविला आहे. त्यामुळे चोरट्याला दुकानातील सर्व माहिती असल्याचा पोलिसांना अंदाज आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56703 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top