कोवाड-कडलगे ग्रामस्थांचा निर्धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड-कडलगे ग्रामस्थांचा निर्धार
कोवाड-कडलगे ग्रामस्थांचा निर्धार

कोवाड-कडलगे ग्रामस्थांचा निर्धार

sakal_logo
By

20726

-----

भस्मसात घर उभारण्याचा
कडलगे ग्रामस्थांचा निर्धार
‘एक हात मदती’चा संकल्पनेतून दिवसात ४० हजार मदत जमा
अशोक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. १० ः कडलगे खुर्द (ता. चंदगड) येथील जोतिबा रामू पाटील यांचे सोमवारी सकाळी आगीत भस्मसात झालेले घर पुन्हा उभे करण्याचा निर्धार कडलगे परिसरातील ग्रामस्थांनी ‘एक हात मदती’चा या संकल्पनेतून केला आहे. एका दिवसात ४० हजारांची मदत जमा झाली आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तींच्या दातृत्वाची जोड मिळाल्यास पाटील यांचा उघड्यावर पडलेला संसार नव्याने उभा राहील, अशी आशा निर्माण झाली आहे.
जोतिबा पाटील हे भूमिहीन आहेत. पती-पत्नींनी मोलमजुरी करून संसार उभा केला आहे. सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारे पाटील कोणतेही काम करायला मागे पुढे पाहत नाहीत. शेतीचे काम मिळाले नाही तर ते लाकडे फोडण्याचे काम करतात. अशा गरीब शेतमजूराचे घर सोमवारी आगीत जळाल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. विकत घेतलेले धान्य, कपडे, बॅंकांची कागदपत्रे, रोख रक्कम, सोने, अंथरुण, पांघरुण, भांडी, कपाटे, पलंग यासह प्रापंचिक साहित्य आगीत भस्मसात झाल्याने फक्त अंगावरचे कपडे त्यांच्याकडे शिल्लक राहिले. अशा या गरीब कुटुंबावर संकट कोसळल्याने कडलगे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील अनेकांनी शासकीय मदतीची वाट न पाहता पाटील यांचे घर ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून व श्रमदान देणगीची त्याला जोड देऊन उभे करण्याचा निर्धार केला आहे. त्याची सुरुवात म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांनी रोख १० हजार व पांडुरंग पाटील यांनी दोन हजारांची आर्थिक मदत केली आहे. जोतिबा पाटील यांनी मिळालेली मदत ही ग्रामस्थांकडे जमा केली आहे. वस्तू व रोख रकमेच्या स्वरुपात मदत स्वीकारण्याचे नियोजन केले आहे. एका दिवसात जवळपास ४० हजारांची मदत जमा झाली आहे. मदतीचा ओघ सुरूच आहे. घराचे संपूर्ण छप्पर जळून गेल्याने जळालेल्या वस्तू बाहेर काढण्याचे काम ग्रामस्थ करत आहेत. पुरेशी मदत जमा झाल्यानंतर प्रत्यक्षात घराचे काम सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
------------------
मदतीचा ओघ सुरूच
प्रा. दीपक पाटील, एल. पी. पाटील, पांडुरंग तुकाराम पाटील, पुंडलिक शंकर पाटील, नारायण शंकर पाटील, सुधा पाटील, धाकू पाटील, एन. एस. पाटील, कुमार पाटील, परशराम पाटील, डॉ. अनिल पाटील, यल्लापा पाटील, सुनील पाटील, अश्विनी पाटील, लक्ष्मण पाटील, दौलत पाटील, प्रल्हाद पाटील, किरण पाटील, गजानन जाधव, उत्तम पाटील यांनी आर्थिक मदत केली. अभिजित पाटील (ढोलगरवाडी) यांनी एक महिना पुरेल इतक्या किराणा वस्तू दिल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56709 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top