
लोकहिताला प्राधान्य राहील ः आमदार आबिटकर
20778
----------------
लोकहिताला प्राधान्य राहील
आमदार प्रकाश आबिटकर ः भादवण सोसायटीतील विजयी उमेदवारांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
भादवण, ता. १० ः लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना कायम लोकहिताला प्राधान्य दिले आहे. विकासकामे तळागाळातील जनतेपर्यंत कशी पोहचतील यावर भर राहीला आहे, असे प्रतिपादन राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिकटर यांनी केले.
भादवण (ता. आजरा) येथील भादवण विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील जागर सहकाराचा सन्मान विजयी उमेदवरांचा या अंतर्गत विजयी उमेदवारांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी आमदार आबिटकर होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे प्रमुख उपस्थित होते.
आमदार आबिटकर म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारने कायम विकासकामांवर भर दिला आहे. आम्ही मतदारसंघात विविध विकासकामे करीत आहोत. जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यावर आमचा भर राहिला आहे. कोणतेही गाव विकासापासून वंचित राहू नये याकडे कटाक्ष असतो. रस्ते, पाणी यासह विविध पायाभूत सुविधा मतदार संघातील प्रत्येक गावात पोहोचवण्यासाठी धडपड सुरु आहे. भादवण येथील संस्थेत शिवसेना प्रणित आघाडीने मिळवलेला विजय कौतुकास्पद आहे. सेवा संस्थेच्या प्रगतीसाठी निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी झटावे. सभासद शेतकऱ्यांचे हित जपावे. श्री. देवणे, सरपंच संजय पाटील, दयानंद पाटील, प्राचार्य रणजित गाडे यांची भाषणे झाली. सुधीर जाधव, दत्तात्रय जाधव, शिवाजी जाधव, शांताराम माने, अशोक गोवईलकर, दत्तात्रय शिवणग, प्रमोद घाटगे व सेवा संस्थेचे नुतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, कारखाना संचालक राजेंद्र सावंत, उद्योजक अतुल पाटील, उपसरपंच बाळासाहेब कुंभार आदी उपस्थित होते. सदाशिव देवेकर यांनी स्वागत, प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले. दयानंद पाटील यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56768 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..