
ओंकार महाविद्यालयात विविध स्पर्धा
ओंकार महाविद्यालयात विविध स्पर्धा
गडहिंग्लज : येथील ओंकार कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयात कॉमर्स विभागातंर्गत इंग्रजी वाचन व शब्द लक्षात ठेवण्याच्या स्पर्धा उत्साहात झाल्या. प्र प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. या स्पर्धेत भाग्यश्री शिवणे, प्रियांका बाबर, वैष्णवी कदम, कोमल पावले यांनी यश मिळविले. संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर यांचे प्रोत्साहन मिळाले. डॉ. महेंद्र जाधव यांनी परीक्षण केले. प्रा. मेघा बाळेशगोळ यांनी संयोजन केले. धनश्री शिवणे यांनी आभार मानले.
--------------------------------------
भित्तीपत्रक स्पर्धेत रणवरेचे यश
गडहिंग्लज : राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृति शताब्दीनिमित्त साधना कॉलेज ऑफ कॉमर्समधील अर्थशास्त्र विभागामार्फत झालेल्या भित्तीपत्रक स्पर्धेत श्रुती रणवरे, मनाली पाटील, रिया बैरागी यांनी यश मिळवले. जे. बी. बारदेस्कर अध्यक्षस्थानी होते. डी. के. कुंभार प्रमुख पाहुणे होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण केले. प्रमुख वक्ते कुंभार यांनी राजर्षी शाहू महाराजांची उद्योगशीलता या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. वैशाली भिऊंगडे, साधना ज्यु. कॉलेज ऑफ कॉमर्सच्या एचओडी अनिता पवार, साधना हायस्कूलचे मुख्याध्यापक जी.एस. शिंदे उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56769 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..